Advertisement

AICTE : ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे गुणवंत मुलींना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच बंद केली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांनी आतापर्यंत यासाठी अर्ज केला नसेल तर ते एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी या स्कॉरशीपसाठी () अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड झाल्यास त्यांना ५० हजार रुपये मिळतील. योजनेसाठी पात्र अटी पूर्ण करणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरील नोटिफिकेशन वाचल्यानंतरच या स्कॉलरशीपसाठी अर्ज करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनामार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असतात. त्यामध्ये AICTE शिष्यवृत्तीला विशेष महत्व आहे. यंदा या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर अर्ज करता येणार आहे. याप्रमाणे करा अर्ज अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर जा. होम पेजवर स्कॉलरशिप वर जा. यानंतर AICTE स्किमवर क्लिक करा. अर्जाची लिंक वेबसाइटवरच उपलब्ध आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी योग्य माहिती भरा. चुकीचा किंवा अपूर्ण माहिती असलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही. जर एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी AICTE मार्फत मान्यता प्राप्त डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम शिकत असेल तर तो AICTE च्या SWANATH योजनेसाठी अर्ज करू शकतो. या अंतर्गत विद्यार्थ्याना वर्षातून ५० हजार रुपये इतकी स्कॉलरशीप मिळते. या योजनेंतर्गत एक हजार पदवी आणि एक हजार पदविका अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ची मान्यता नसलेल्या विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. अर्जदाराने ड्युअल डिग्रीला प्रवेश घेतला असेल तर अर्ज बाद होऊ शकतो. स्कॉलरशीप मिळाल्यावर दरवर्षी पुढील वर्गात गेल्याच प्रमाणपत्र जमा न केल्यासही अर्ज बाद होऊ शकतो. उत्पन्नाचं योग्य प्रमाणपत्र नसेल, तरीही अर्ज बाद ठरतो. कोणत्या शिष्यवृत्तीत किती रक्कम ? एआयसीटीई पीजी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांना दरमहा १२ हजार ४०० रुपये दिले जातात. ही शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी म्हणजे २४ महिने किंवा वर्ग संपेपर्यंत दिली जाते. स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्याला वार्षिक ५० हजार रुपये दिले जातात. ही शिष्यवृत्ती प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांना ४ वर्षांसाठी, तर डिप्लोमा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना ३ वर्षांसाठी दिली जाते. सक्षम शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. तर प्रगती शिष्यवृत्ती ही विद्यार्थिनींसाठी आहे. या दोन्ही शिष्यवृत्ती योजनांतर्गत विद्यार्थ्यांना ५०-५० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनांबद्दल तपशील माहिती AICTE च्या वेबसाइटवर मिळू शकते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/aicte-scholarship-few-days-are-left-to-apply-in-aicte-scholarship-50000-rupees-are-available-every-year/articleshow/89010832.cms