Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १९ जानेवारी, २०२२, जानेवारी १९, २०२२ WIB
Last Updated 2022-01-19T06:01:00Z
Rojgar

BECIL मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Advertisement
Recruitment 2022: ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टिंग इंडिया लिमिटेड (BECIL)मध्ये विविध पदांची भरती (BECIL Supervisor Recruitment 2022) करण्यात येत आहे. हा विभाग केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. बेसिल पदभरतीअंतर्गत सुपरवायझर (Supervisor)आणि इन्व्हेस्टिगेटर (Investigator)च्या ५०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सुपरवायझरची ३५० आणि इन्व्हेस्टिगेटरची १५० पदे भरली जाणार आहेत. ही भरती कंत्राटी स्वरुपाची विशिष्ट कालावधीसाठी असणार आहे. अर्ज प्रक्रिया अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- becil.com वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या करिअर पर्यायावर क्लिक करा. Applications are invited for recruitment/ empanelment of manpower purely on contract basis या लिंकवर क्लिक करा. आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा. मागितलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढा. पात्रता इन्व्हेस्टिगेटर आणि सुपरवायझर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून डिग्री, कॉम्प्युटरवर काम करण्याचा अनुभव असायला हवा. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल ५० वर्षे असावे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. कागदपत्र पडताळणी आणि उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी मुलाखत घेतली जाईल. जर या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. याबाबत उमेदवारांना कळवण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज फक्त ई-मेलद्वारे सबमिट केले जाऊ शकतात. भरती सूचनेनुसार, इतर माध्यमातून पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी २५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर, becil.com या वेबसाइटवरून अर्जाची लिंक काढून टाकली जाईल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/becil-recruitment-2022-opportunity-to-get-job-on-supervisor-and-investigator-posts-know-how-to-apply/articleshow/88987735.cms