Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १ जानेवारी, २०२२, जानेवारी ०१, २०२२ WIB
Last Updated 2022-01-01T06:00:56Z
Rojgar

गुड न्यूज! नव्या वर्षात एमपीएससीमार्फत ७५६० पदांची होणार भरती

Advertisement
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे () आणि सरळसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२१ वर्षाअखेरीपर्यंत ''ने राज्याच्या विविध विभागांकडून मागवलेल्या रिक्त जागांच्या माहितीपत्रात ७५६० जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे येत्या वर्षात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये 'अ', 'ब' आणि 'क' गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र देण्यास 'एमपीएससी'ने सांगितले होते. त्याप्रमाणे राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांची संख्या 'एमपीएससी'कडे प्राप्त झाली असून, राज्यात तिन्ही गटांच्या एकूण ७५६० जागा रिक्त आहेत. यामुळे यातील ४३२७ पदांसाठी जाहीराती यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. या परीक्षांत पुढील काही महिन्यात होणार आहेत. याचबरोबर उर्वरित ३२३३ जागांसाठीच्या परीक्षा याच वर्षी घेण्यात येणार आहेत. यामुळे नवे वर्ष 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. राज्यातील सामान्य प्रशासन विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग या विभागांमध्ये सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षा अशा दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत. या पदांसाठी येत्या वर्षात विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे. या संदर्भातील सविस्तर यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात विभागवार रिक्त पदांची संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये फारशा परीक्षा झालेल्या नाहीत. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत होते. परीक्षा होत नसल्याने अनेकांच्या कमाल वयाची मर्यादा ओलांडून चालली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या वर्षात रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने परीक्षांची संख्याही वाढणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. 'एमपीएससी'ने लवकरात लवकर परीक्षांची वेळापत्रक आणि जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी आता विद्यार्थी करत आहेत. 'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या वाढल्याने 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येत्या वर्षात या सर्व पदांसाठी परीक्षा घेऊन 'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. लवकरात लवकर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे. - महेश घरबुडे, 'एमपीएससी' समन्वय समिती


source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-to-fill-7560-posts-in-maharashtra-government-in-new-year-2022/articleshow/88628525.cms