चिंता वाढली! शिक्षिकेला करोनाची लागण; ३०० विद्यार्थ्यांची चाचणी होणार

चिंता वाढली! शिक्षिकेला करोनाची लागण; ३०० विद्यार्थ्यांची चाचणी होणार

हिंगोली: जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील एक शिक्षिकेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिक्षेकेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर शाळा प्रशासनाने गुरुवारी शाळेतील सर्व ३०० विद्यार्थ्यांसह ४० शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली शहरामध्ये मागील तीन दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कधी दोन तर कधी तीन असे रुग्ण आढळून येत आहेत. तीन दिवसात एकूण अकरा रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, शहरातील खासगी शाळेतील एक शिक्षिका कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने उपाययोजना म्हणून इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतच्या ३०० विद्यार्थ्यांची तसेच ४० शिक्षकांची आरटीपिसीआर चाचणी घेण्यासाठी आरोग्य विभागाला कळवले आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालयाचे पथक शाळेमध्ये पोहोचले आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे स्वॅब नमूने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. वाचाः यासंदर्भात शाळा प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी एक शिक्षिका कोविड पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व विद्यार्थी व शिक्षकांची कोविड चाचणी केली जात आहे. शाळा सुरू ठेवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी व शिक्षकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शाळेमध्ये सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. वाचाः


source https://maharashtratimes.com/career/career-news/one-teacher-tested-covid-positive-in-hingoli/articleshow/88732711.cms

0 Response to "चिंता वाढली! शिक्षिकेला करोनाची लागण; ३०० विद्यार्थ्यांची चाचणी होणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel