Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ११ जानेवारी, २०२२, जानेवारी ११, २०२२ WIB
Last Updated 2022-01-10T20:48:41Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

यूपीएससीची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी

Advertisement

प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षाकरिता महत्त्वपूर्ण असणाऱ्या पर्यावरण पारिस्थितिकी या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. पर्यावरणामध्ये जैविक, मानव, प्राणी, आणि वनस्पती यांच्याशी निगडित असलेल्या सर्वच घटकांचा समावेश होतो तर पारिस्थितीकीमध्ये जैविक व अजैविक घटकांमधील परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासघटकाची व्याप्ती अधिक आहे. पर्यावरणाचे सर्व पैलू समजून घेण्यासाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल संसाधन व्यवस्थापन, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्र व लोकसंख्या यांच्याशी संबंधित विषय समजून घेणे गरजेचे ठरते. पर्यावरणाची व्याप्ती अतिशय मोठी आहे.

सजीव आणि पर्यावरण यांच्या परस्परसंबंधाचे अध्ययन पारिस्थितीकीशी निगडित आहे. प्राणी किंवा वनस्पतीचे नैसर्गिक समूह व त्यांचे घटक ज्या तत्त्वानुसार काम करतात ते सर्वसामान्य तत्त्व दाखवून देण्याचे कार्य पारिस्थितीकीचे आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वनस्पती किंवा प्राण्यांच्या क्रियांचा अर्थ समजण्यासाठी पारिस्थितिकीचा उपयोग होऊ शकतो. हवा, पाणी, माती, वन्यजीवन यांच्या संवर्धनासाठी पारिस्थितिकीची समज उपयोगी पडते. यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता या अभ्यास घटकामध्ये ढोबळमानाने पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता, शाश्वत विकास, वातावरण बदल इत्यादीशी संबंधित मुद्दय़ांचा समावेश होतो. यूपीएससीने या घटकाच्या तयारीसाठी कोणत्याही प्रकारच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नसल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद केले आहे. या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे या घटकाचे समकालीन स्वरूप होय. असे असले तरी पारंपरिक घटकांचे अध्ययन करणे आवश्यक ठरते. या अभ्यास घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्न संख्येवरून याचे पूर्व परीक्षेतील महत्त्व अधोरेखित होते. या घटकावर २०११ ते २०२१ या कालावधीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पुढीलप्रमाणे –

या घटकावर प्रभुत्व मिळवण्याकरिता पारिस्थितिकीतील परिसंस्था, अन्नसाखळी, किस्टोन स्पेसीज, युट्रो फिकेशन इ. महत्त्वाच्या संकल्पना माहीत करून घ्याव्यात. या अभ्यास घटकांमध्ये पर्यावरणीय प्रदूषण हा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये प्रदूषण, प्रदूषणाची कारणे, उपाय, प्रदूषण रोखण्याकरता वेळोवेळी करण्यात आलेले कायदे, संस्था याबाबत जाणून घ्यावे. तसेच पर्यावरणीय प्रदूषण संबंधीच्या  COD,  BOD,  Bioremediation इ. संकल्पना समजून घ्याव्यात. या अभ्यास घटकांमध्ये अधिक गुण मिळवून देणारा घटक म्हणजे जैवविविधता होय. कारण जैवविविधतेवर विचारण्यात येणार्या प्रश्नांची संख्या अधिक आहे. यामध्ये जैवविविधतेची संकल्पना, प्रकार, इको सेन्सिटिव्ह झोन, वन्यजीव अभयारण्य, नॅशनल पार्क, देवराई, जीवावरण राखीव क्षेत्र, जैवविविधता हॉटस्पॉट,  In situ आणि क्रसंवर्धन, व्याघ्र प्रकल्प इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण आहेत.

जैवविविधतेबरोबरच दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हवामान बदल होय. हा घटक समकालीन स्वरूपाचा आहे परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही अधिक आहे. या घटकांमध्ये हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, हरितगृह वायू परिणाम, हरितगृह वायू आदी संकल्पनांबरोबरच हवामान बदलाशी संबंधित संस्था जसे यूएन एफसीसी, क्योटो प्रोटोकॉल,  आयपीसीसी आदी पुढाकार, ओझोन अवक्षय, कार्बन ग्रामण, कार्बन सिंक, कार्बन क्रेडिट उत्सर्जन व्यापार, महासागरांचे आम्लीकरण, हवामान बदलविषयक दरवर्षी होणाऱ्या परिषदांचा मागोवा घेणे श्रेयस्कर ठरते. पर्यावरणविषयक कार्यरत असणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय परिषदा उदा. रियो समिट, रामसर कन्व्हेन्शन,  IUCN, स्टॉकहोम परिषद रॉटरडॅम परिषद, बेसल कन्व्हेन्शन इत्यादींची माहिती घेणे आवश्यक ठरते. यासोबतच राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथोरिटी, वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्यूरो, निमल वेल्फेअर बोर्ड, सेंट्रल झू अथोरिटी, एनजीटी तसेच  CAMPA क्लीन एनर्जी फंड आदी संस्थांविषयी जाणून घ्या. पर्यावरण पारिस्थितिकी या घटकाच्या तयारी करता ‘पर्यावरण व पारिस्थितीकी’ (अतुल कोटलवार, इंद्रजीत यादव) हा संदर्भ ग्रंथ उपयुक्त आहे. यासोबतच ecology and environment हा संदर्भ ग्रंथही पाहावा. पर्यावरण क्षेत्रातील समकालीन घडामोडींकरिता इंडियन एक्स्प्रेस, बुलेटिन, डाऊन टू अर्थ आदींचे नियमितपणे वाचन करून नोट्स बनवाव्यात. तसेच केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संकेतस्थळांना नियमित भेट द्यावी.

२०२१ यूपीएससी पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे :

 द. १. ब्ल्यू कार्बन काय आहे?

१. महासागर आणि किनारी भागातील पारिस्थितिकी व्यवस्थेद्वारा प्रगृहीत कार्बन.

२. बायोमास आणि कृषी मृदा यामध्ये प्रच्छादित कार्बन.

३. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यामध्ये समाविष्ट असणारा कार्बन.

४. वायू मंडळातील विद्यमान कार्बन.

द. २. ताम्र प्रगलन (copper smelting) सयंत्रासंबंधी चिंतादायक बाबी काय आहेत?

१. हे पर्यावरणामध्ये कार्बन मोनॉक्साईडचे उत्सर्जन करतात.

२. ताम्रमल (copper slag) पर्यावरणामध्ये जड धातूंच्या निक्षालनास कारणीभूत ठरते.

३. ते सल्फर डायऑक्साइडचे प्रदूषकाच्या रूपामध्ये उत्सर्जन करतात.

The post यूपीएससीची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: यूपीएससीची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकीhttps://ift.tt/3dmx3ZV