TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

यूपीएससीची तयारी : सामान्य विज्ञान

प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेतील सामान्य विज्ञान या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील इतर घटकांइतकाच महत्त्वाचा पण काहीसा दुर्लक्षित असणारा हा अभ्यास घटक आहे. सामान्य विज्ञान या आत्तापर्यंत सरासरी घटकावर सुमारे १० ते २० इतके प्रश्न विचारले गेलेले आहेत. २०११ ते २०२१ या कालावधीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या पुढीलप्रमाणे :

सामान्य विज्ञान या अभ्यास घटकांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व कृषिशास्त्र या पारंपरिक विषयांबरोबरच जैवतंत्रज्ञान, अवकाश संशोधन, जनुकीय तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, दूरसंचार तंत्रज्ञान इत्यादी घटकांचा समावेश होतो. या अभ्यास घटकांची व्याप्ती अधिक आहे. परिणामी, बहुतांश परीक्षार्थी या घटकाची तयारी कशी करावी याविषयी संभ्रमावस्थेत असतात आणि म्हणूनच हा अभ्यास घटक दुर्लक्षित असल्याचे दिसते. मात्र आजवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे अध्ययन करता असे आढळते की, सामान्य विज्ञानातील मूलभूत संकल्पना अवगत असल्यास या अभ्यास घटकावर प्रभुत्व मिळवता येते. या अभ्यास घटकाची व्याप्ती लक्षात घेता परीक्षार्थीनी सर्वप्रथम मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे. सामान्य विज्ञानाच्या तयारीकरता कोणत्याही विशेष ज्ञानाची अथवा शास्त्र शाखेची पदवी असणे आवश्यक नसते. कला व वाणिज्य शाखांमधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही हा विषय सहजपणे आत्मसात करता येतो. ही बाब २०२१च्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या पुढील प्रश्नावरून स्पष्ट होते.

द. निसर्गामध्ये खालीलपैकी कोणता/कोणते जीव मृदाविरहित पृष्ठभागावर जिवंत राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे?

फर्न

लायकेन

मॉस

मशरूम

या प्रश्नाचे उत्तर जीवशास्त्राचे मूलभूत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना सहजपणे देता येऊ शकते. त्याकरिता विशेष तयारीची आवश्यकता नसते. सर्वानी शालेय जीवनात असताना अशा बाबींचा अभ्यास केलेला असतो. याच प्रकारचा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असणारा पुढील प्रश्न पाहू या :

द. प्रेशर कुकरमध्ये ज्या तापमानाला अन्न शिजवले जाते, ते खालीलपैकी मुख्यत: कशावर अवलंबून असते.

१. झाकणामध्ये असणाऱ्या छिद्राचे क्षेत्रफळ.

२. जाळाचे तापमान.

३. झाकणाचे वजन.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

हा प्रश्न भौतिकशास्त्रातील संकल्पनांच्या उपयोजनावर आधारित आहे. सामान्य विज्ञानाची तयारी त्यामध्ये समाविष्ट विषयांपासून करावी. उदा. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय सामान्य विज्ञानाचा गाभा आहेत. भौतिकशास्त्रातील विविध नियम जसे  optics, ध्वनी, चुंबकत्व, विद्युत इ. बाबी अभ्यासणे गरजेचे आहे. जीवशास्त्र या विषयामध्ये पचनसंस्था, प्रजननसंस्था, विविध प्रकारचे रोग, पेशींचे प्रकार, वनस्पतींचे वर्गीकरण, जीवनसत्त्वे यांची माहिती घ्यावी लागते. रसायनशास्त्रामध्ये  महत्त्वाची संयुगे, खनिजे व त्यांचा आढळ, धातू व त्यांचे गुणधर्म, कार्बन व त्याची संयुगे, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असणारा रसायनशास्त्राचा होणारा उपयोग यावरदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. यासोबत जैव तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, नॅनो तंत्रज्ञान,  माहिती तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, ऊर्जा, संरक्षण या घटकावर प्रभुत्व मिळवावे लागते. ह्या घटकांवर विचारण्यात येणारे प्रश्न प्रामुख्याने चालू घडामोडींवर आधारित असतात.

 द. पुन:संयोजित व्हेक्टर व्हॅक्सिनशी संबंधित, सध्याच्या काळात होत असलेल्या विकासाच्या बाबतीत खालील विधानांवर विचार करा :

१. या लसींच्या निर्मितीत जनुकीय अभियांत्रिकीचा वापर केला जातो.

२. जिवाणू व विषाणूंचा वापर रोगवाहक (Vector) म्हणून केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

विज्ञान तंत्रज्ञानातील मूलभूत अभ्यासासोबत या घटकावर आधारित समकालीन घडामोडी उदा. सरकारी धोरणे, नवीन शोध, या क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार इ. बाबींचा मागोवा घेत राहाणे आवश्यक ठरते.

या अभ्यासघटकाची तयारी  NCERT च्या क्रमिक पुस्तकांपासून करता येईल. एखाद्या विद्यार्थ्यांला इंग्रजी भाषेची अडचण असल्यास स्टेट बोर्डाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकांचा वापर करता येईल. ही पुस्तके मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. यासोबत शक्य असल्यास सायन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ इ. मासिके, इंडियन एक्स्प्रेससारखे वृत्तपत्र वाचावे. याशिवाय बुलेटिन मासिकामधून सर्व मुद्दे कव्हर करता येतील. एखाद्या संकल्पनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करावा. इस्रो, डीआरडीओ, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांची संकेतस्थळे नियमितपणे पाहावीत. मानवी शरीरासंबंधी माहितीकरिता ह्युमन मशीन हे एनबीटी प्रकाशनाचे पुस्तक वापरावे. सामान्य विज्ञानातील सर्व घटक एकत्रितरीत्या अभ्यासण्यासाठी जनरल सायन्स हे सोनाली भुसारे लिखित पुस्तक उपयुक्त ठरेल.

The post यूपीएससीची तयारी : सामान्य विज्ञान appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: यूपीएससीची तयारी : सामान्य विज्ञानhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या