TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नोकरीची संधी

सुहास पाटील : suhassitaram@yahoo.com

देशभरातील विविध कँटॉन्मेंट आणि मिलिटरी स्टेशन्समधील १३६ आर्मी पब्लिक स्कूल्स (APS) मध्ये रिसर्च टीचर्स पदांची नियमित किंवा ठरावीक कालावधीसाठी भरती.

या शाळा स्थानिक मिलिटरी अ‍ॅथॉरिटीजकडून चालविल्या जातात आणि त्या आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (अहएर) मार्फत  उइरए बोर्डाशी संलग्न असतात.

महाराष्ट्रातील आर्मी पब्लिक स्कूल्सची नावे –

(१) APS, पुणे; (२)  APS, खडकी; (३)  APS, दिघी; (४)  APS, देहू रोड; (५)  APS, खडकवासला; (६)  APS, देवळाली; (७)  APS, मुंबई; (८)  APS, अहदमदनगर; (९)  APS, काम्टी.

भरती करावयाच्या पदांचा तपशील –

(१) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ( PGT) – पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि बी.एड.

(२) ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर ( TGT) – पात्रता – पदवी आणि बी.एड.

(३) प्रायमरी टीचर (PRT) – पदवी आणि २ र्वष कालावधीचा एलिमेंटरी एज्युकेशन डिप्लोमा किंवा बी.एड.

PGT आणि  TGT पदे पुढील विषयांसाठी असतील – इंग्लिश, हिंदूी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स / आयटी, फिजिकल एज्युकेशन. यांशिवाय  PGT पदांसाठी बायोटेक्नॉलॉजी, सायकॉलॉजी, कॉमर्स, होम सायन्स या विषयांचे टीचर निवडले जातील. तसेच संस्कृत विषयासाठी  TGT पद भरले जाईल.

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत उमेदवारांना किमान सरासरी ५०% गुण मिळालेले असावेत.

शिवाय उमेदवारांना पदवी आणि पदव्युत्तर पदवीला अभ्यासलेल्या प्रत्येक विषयात किमान ५०% गुण मिळालेले असावेत.

ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) पदांसाठी ज्या उमेदवारांना पदवी परीक्षेत ५०% पेक्षा कमी गुण मिळाले आहेत, परंतु त्यांना पदव्युत्तर पदवीला ५०% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत व ज्या विषयातील पदांसाठी अर्ज केला आहे, त्या विषयात ५०% पेक्षा अधिक गुण मिळविले असतील असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

TGT/ PRT पदांसाठीच्या ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्टकरिता  CTET/TET उत्तीर्ण असणे अनिवार्य नाही. परंतु  TGT/ PRT पदांवरील नेमणुकीकरिता केंद्र सरकार/राज्य सरकारकडून घेतली जाणारी  CTET/TET उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. जे उमेदवार  CTE/TET उत्तीर्ण नाहीत अशा उमेदवारांचा अशी पात्रता प्राप्त होईपर्यंत (TGT/ PRT पदांवरील नेमणूक) तात्पुरत्या स्वरूपाची (Adhoc) असेल.

वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०२१ रोजी ५ वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ४० वर्षे. (DSEA & RR मधील पदांसाठी ज्या उमेदवारांकडे गेल्या १० वर्षांमधील ५ पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे अशा उमेदवारांचे वय ५७ वर्षांपेक्षा कमी असावे.)

निवड पद्धती – स्टेज-१ – ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (दि. १९ आणि २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाईल.) स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण करण्याच्या दिवसापासून ३ वर्षेपर्यंत उमेदवार निवड प्रक्रियेच्या इतर स्टेजेस देण्यास पात्र असतील. ऑनलाइन परीक्षेचा निकाल दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाईल.

ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्टची ओळख व्हावी म्हणून सरावासाठीची मॉक टेस्टची लिंक रजिस्ट्रेशन पोर्टलवर दि. १ फेब्रुवारी २०२२ पासून उपलब्ध करून दिली जाईल.

स्टेज-२ – मुलाखत. आर्मी पब्लिक स्कूल स्थानिक वर्तमानपत्रातील / संकेतस्थळावरील / नोटीस बोर्डवर रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करतील. त्यानुसार ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्टमधील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीकरिता अर्ज करू शकतात.

स्टेज-३ – शिकविण्याच्या कौशल्याचे मूल्यमापन करणे आणि संगणकावरील कौशल्य तपासणे. याशिवाय भाषा शिक्षक पदांकरिता १५ गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. (ज्यात निबंध व आकलन ( comprehension) तपासले जाईल.)

परीक्षा केंद्र – पुणे, नाशिक, मुंबई, अहमदनगर, नागपूर इ.

PGT,  TGT आणि  PRT पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन स्क्रीन टेस्टचा अभ्यासक्रम http://www.awesindia.com या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील  Annexure-४ मध्ये उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्क – रु. ३८५/-.

ऑनलाइन नोंदणी  https://register.cbtexam.in/AWES/ Registration/ या पोर्टलवर दिनांक २८ जानेवारी २०२२ पर्यंत करावे.

शंकासमाधानासाठी हेल्पलाइन नंबर ६२६८०३०९३९, ६२६८००३२६४, ६२६३१७८४१४ किंवा ६२६८०६२१२९ वर संपर्क साधा.

ऑनलाइन नोंदणी करताना (१) छायाचित्र आणि स्वाक्षरी, (२) जन्मतारखेचा पुरावा आणि (३) शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अँड सेंटर, खडकी, पुणे – ४११ ००३ मध्ये पुढील ६५ सिव्हिलियन ग्रुप ‘सी’ डिफेन्स सिव्हिलियन पदांची भरती.

(Recruitment Notice ०१/२०२२)

(१) स्टोअर कीपर ग्रेड- III – ३ पदे (खुला) (१ पद दिव्यांग कॅटेगरी  LV/D/HH/OH इ. साठी राखीव).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण.

इष्ट पात्रता – (१) संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव. (२) स्टोअर कीपर/स्टोअर मॅनेजमेंटमधील सर्टिफिकेट कोर्स. (३) कॉम्प्युटरचे ज्ञान (MS- Word)

(२) सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर (ट्रेड्स – रेजिमेंटल सव्‍‌र्हेअर टेक्निकल, इलेक्ट्रिशियन, फिटर, इंजिन आर्टिफिसर, वेल्डर, आर्टिझन (कन्स्ट्रक्शन), आर्टिझन (मेटॅलर्जी), आर्टिझन (वूडवर्क), पेंटर अँड डेकोरेटर,  PCR &  DSV) – २२ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस् – २, खुला – ११) (२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा संबंधित ट्रेडमधील  NCTVT आणि ट्रेनिंग देण्याचे कौशल्य अवगत असावे.

(३) कूक – ९ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ६).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इंडियन कुकिंगचे ज्ञान व कौशल्य.

(४) लास्कर – ६ पदे (इमाव-१, खुला-५).

(५) (MTS) मेसेंजर – ८ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ५).

(६) (MTS) वॉचमन – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५).

(७) (MTS) गार्डनर – ५ पदे (इमाव – १, खुला – ४).

(८) (MTS) सफाईवाला – २ पदे (खुला).

(९) (MTS) वॉशरमन – २ पदे (खुला).

इष्ट पात्रता – मिलिटरी/सिव्हिलियन कपडे धुऊन इस्त्री करणे अवगत असावे.

(१०) बार्बर – १ पद (खुला).

पद क्र. ४ ते १० साठी पात्रता – १० वी उत्तीर्ण.

इष्ट पात्रता – संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव.

सर्व पदांमधील प्रत्येकी १ पद दिव्यांग उमेदवारांसाठी.

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे).

वेतन – स्टोअर कीपर, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर आणि कूक पदांसाठी वेतन श्रेणी-२ अंदाजे वेतन दरमहा रु. ३२,०००/-.

इतर पदांसाठी – वेतन श्रेणी-१ अंदाजे वेतन रु. २९,०००/- दरमहा.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणानुक्रमे उमेदवार लेखी परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. (पदास असलेल्या पात्रतेनुसार) लेखी परीक्षा हिंदी व इंग्रजी माध्यमातून ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न.

लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी बाँबे इंजिनीअर ग्रुप अँड सेंटर मुख्यालय, खडकी, पुणे – ४११ ००३ येथे घेतली जाईल.

अर्जाचा विहित नमुना आणि अ‍ॅडमिट कार्ड  www.indianarmy.nic.in व  www. bsakirkee.org या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतींसह दि. २८ जानेवारी २०२२ पर्यंत पुढील पत्त्यावर साध्या पोस्टाने पोहोचतील असे पाठवावेत. The Commandant,Headquartrs,Bombay Engineer Group and Centre,Kirkee, Pune,  Pin – ४११ ००३. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘ Application for the post of ____ in Category __________
( UR/ OBC/ SC,  ST,  EWS,  ESM,  PWD)’ असे ठळक अक्षरात लिहावे.

The post नोकरीची संधी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: नोकरीची संधीhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या