Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ५ जानेवारी, २०२२, जानेवारी ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-01-05T08:00:04Z
Rojgar

सिंधुताईंची अपूर्ण इच्छा आता तरी पूर्ण होणार का? शिक्षणविभागाकडे होतेय मागणी

Advertisement
biography: ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय, प्रेमाची सावली असलेल्या, सर्व सामान्यांची ताई असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रासह सर्व देश शोकसागरात बुडाला. राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, कलाकार सर्व सामान्य जनतेसह देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा श्रध्दांजली वाहून सिंधुताईंच्या निधनानंतर आपला शोक व्यक्त केला. समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी एक खंत मात्र व्यक्त केली होती. ताईंचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात लावण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकारने मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली घेतली नाही. ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती. ती क्लिप आता सर्वत्र वायरल होत आहे. महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठ होतं अशी शोकांतिका आपल्या राज्याची आहे असं मत या व्हिडिओमध्ये आहे. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख आहे. सोन्यासारखी माणसे या मातीमध्ये जन्माला आली त्या महाराष्ट्रात जन्मलेल्या सिंधुताईंची अखेरची इच्छा मात्र शिक्षण विभागाने आता पूर्ण करावी असा सूर आज शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पुर्ण करावी असा एक संदेश समाजात फिरत आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/sindhutai-sakpal-book-in-maharashtra-school-syllables-unfulfilled-desire-comes-to-be-of-perfect-honor/articleshow/88704837.cms