कायद्याचे शिक्षण घेऊन बघा; विधी अभ्यासक्रम प्रवेश मागणीत वाढ

कायद्याचे शिक्षण घेऊन बघा; विधी अभ्यासक्रम प्रवेश मागणीत वाढ

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई तीन आणि पाच वर्षांच्या कायदेविषयक (LLB) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी या प्रवेशांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी पहिल्या प्रवेशफेरीत ६,७५९ तर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ३,२१७ विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेश घेतले आहेत. कायदे क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांचा कायदेविषयक अभ्यासक्रम (LLB) किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांच्या कायदा अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. यंदा या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्या पाहिली असता राज्यभरातील तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेल्या १४७ विधी कॉलेजांत १६ हजार २६० जागा कॅप प्रवेशासाठी तर संस्थास्तरावर १ हजार ३४० जागा आहेत. या जागासाठी ४६ हजार १६७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. पहिल्या यादीत ६,७५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत तर दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली आहे. पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील १३२ कॉलेजांत सुमारे १० हजार ६४७ जागा आहेत. तर संस्थास्तरावरील जागा १ हजार १०७ जागा आहेत. या जागावर प्रवेश मिळवण्यासाठी १२ हजार ८८९ विद्यार्थ्यांची अंतिम यादीत नोंद झाली आहे. यापैकी पहिल्या यादीत ३, २१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तपशील एलएलबी ३ एलएलबी ५ कॉलेज १४७ १३२ ऑनलाइन प्रवेशासाठी जागा १६२६० १०६४७ संस्थास्तरावरील जागा १३४० ११०७ सीईटी दिलेले ५६५८९ १६०७१ प्रवेशासाठी नोंदणी ४६१६७ १२८८९ अंतिम गुणवत्ता यादी ३६९७५ १०९१८ पहिल्या यादीत प्रवेश १३४२३ ७०८९ घेतलेले प्रवेश ६७५९ ३२१७ पहिल्या यादीनंतर शिल्लक जागा ९५०१ ७४३० हमखास रोजगार तीन वर्षांऐवजी पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे काही विद्यार्थ्यांचा कल आहे. हमखास रोजगार मिळवून देत असल्याने एलएलबी अभ्यासक्रमाला पसंती मिळत असल्याचे चित्र यंदाही कायम असल्याचे सीईटी सेलकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. कायद्याचे ज्ञान बदलत्या काळाबरोबरच कायद्याबाबत सजग पिढी तयार होत असल्याने कायद्याचे शिक्षण घेण्याकडे तरुणांचा ओढा अधिक दिसत आहेत. बहुतांश विद्यार्थी कायद्याचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने जोड शिक्षण म्हणूनही प्रवेश घेत आहेत. शिवाय या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती मिळाल्यामुळे या अभ्यासक्रमांना गेल्या दोन वर्षांपासून मागणी वाढू लागल्याचे मुंबईतील विधी कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/llb-admisson-2022-increase-in-law-course-admission-in-maharashtra/articleshow/88870921.cms

0 Response to "कायद्याचे शिक्षण घेऊन बघा; विधी अभ्यासक्रम प्रवेश मागणीत वाढ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel