Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ६ जानेवारी, २०२२, जानेवारी ०६, २०२२ WIB
Last Updated 2022-01-06T13:00:48Z
Rojgar

नागपूर विद्यापीठ उचलणार करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी करोनादरम्यान आपले कमावते पालक गमावले आहेत, अशांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. २०२०-२१ या वर्षात विद्यापीठात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षणशुल्क विद्यापीठ देणार आहे. करोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहेत. अशांपैकी ज्यांचे कमावते पालक दगावले आहेत, त्यांना विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळेल. पदवी अगर पदव्युत्तर अशा कोणत्याही अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळेल. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांची माहिती आता कॉलेजे आणि विद्यापीठ विभागांकडून संकलित करण्यात येईल. कॉलेजांना अशा विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडे जमा करावयाची आहे. 'कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती आल्यानंतर लाभार्थ्यांची खरी संख्या कळेल. या विद्यार्थ्यांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम लाभार्थी विद्यार्थी निश्चित होईल. त्यानंतर, मदतीकरिता लागणाऱ्या निधीचा अंदाज येईल. विद्यार्थी कल्याण निधीमधून याबाबत तरतूद केली जाईल', असे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. अभय मुद्गल यांनी सांगितले. अशा दोन विद्यार्थ्यांना विद्यापीठाने आधीच मदत केली आहे. त्यामध्ये, एक विद्यार्थिनी तुमसर येथील तर दुसरा विद्यार्थी विद्यापीठ विभागांमधील आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/nagpur-university-to-bear-education-expenses-of-those-who-lost-their-parents-in-corona/articleshow/88731565.cms