TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

बनारस विद्यापीठात हिंदू धर्माविषयी अभ्यासक्रम

वाराणसी: बनारस हिंदू विद्यापीठाने () हिंदू धर्माविषयी अभ्यासक्रम () तयार केला असून, असा अभ्यासक्रम नियमित स्वरूपात शिकविणारे ते देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा अभ्यासक्रम पदव्युत्तर आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. हा अभ्यासक्रम कला शाखेचा भाग असेल. भारत अध्ययन केंद्राच्या वतीने तो चालविण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या शताब्दीनिमित्त भारत अध्ययन केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठाचे तत्त्वज्ञान आणि धर्म, संस्कृत आणि प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्वविद्या या शाखांचेही सहकार्य मिळणार आहे. 'या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीत ४५ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये एका परदेशी विद्यार्थ्याचाही समावेश आहे. अभ्यासक्रम चार सत्रांत शिकविला जाईल. त्याचे १६ पेपर होतील,' अशी माहिती भारत अध्ययन केंद्राचे समन्वयक सदाशिवकुमार द्विवेदी यांनी दिली. रेक्टर प्रा. व्ही. के. शुक्ला यांच्या उपस्थितीत मंगळवारी १८ जानेवारीला अभ्यासक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. 'हा अभ्यासक्रम आंतरशाखीय असेल. सन २०२०मधील नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून तो तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात म्हणजे अभिनव प्रयोग आहे,' असे शुक्ला म्हणाले. अभ्यासक्रम प्रारंभाच्या कार्यक्रमात इंदिरा गांधी कला केंद्राचे संचालक विजय शंकर शुक्ला म्हणाले, 'अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची आवश्यकता होतीच. अठराव्या शतकात पं. गंगानाथ झा यांच्यापासून ते महात्मा गांधी, पं. मदनमोहन मालवीय अशा अनेकांनी अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची संकल्पना मांडली होती. काही कारणाने ती मागे पडली होती, आता या अभ्यासक्रमाच्या रूपाने उद्दिष्ट साध्य झाल्याचे दिसते आहे.' वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि 'बीएचयू'तील भारत अध्ययन केंद्राचे शताब्दी अध्यासन प्रमुख कमलेशदत्त त्रिपाठी यांनी एकता आणि मूल्ये हा हिंदू धर्माचा गाभा असल्याचे सांगितले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/banaras-hindu-university-introduces-course-on-hindu-studies/articleshow/89031361.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या