TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नांदेडच्या ग्रामीण दंत महाविद्यालयात भरती, जाणून घ्या तपशील

Nanded College : नांदेड (Nanded & Research Center) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्रामध्ये डीन / प्राचार्य (Dean / Principal),प्राध्यापक (Professor) आणि वाचक (Reader, लेक्चरर (Lecturer), शिक्षक (Teacher) याची एकूण ९९ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पदभरतीचा तपशील डीन / प्राचार्य पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाचा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. यासोबतच डेंटल इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापक पदाचा ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांकडे भारतीय विद्यापीठाची बीडीएस किंवा त्या समकक्ष डिग्री असणे आवश्यक आहे. या विषयात पदव्युत्तर किंवा राष्ट्रीय मंडळाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. वाचक पदांसाठी उमेदवारांकडे भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी आणि पदव्युत्तर पात्रता किंवा राष्ट्रीय मंडळाचा डिप्लोमा आवश्यक आहे. यासोबतच संबंधित कामाचा किमान ४ वर्षांचा अनुभव असावा. लेक्चरर या पदांसाठी बीडीएस पदवी, पदव्युत्तर पात्रता किंवा राष्ट्रीय मंडळाचा डिप्लोमा पूर्ण असावा. यासोबतच संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव असावा. शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे देखील वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव असावा. या पदांसाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्जासोबत रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज जोडणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज संचालक, श्री गुरुदत्त प्रतिष्ठान नांदेड, नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र, पांगरी गाव, एस.आर.टी.एम. विद्यापीठ, ता. & जिल्हा. नांदेड – ४३१६०६ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. २० जानेवारी २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/nanded-college-recruitment-various-post-vacant-in-rural-dental-college-nanded/articleshow/88770246.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या