TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE 10th, 12th Term 1 Result: ‘या’ वेबसाइट्सला भेट देऊन तपासू शकता निकाल

CBSE Term 1 Result 2021 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)द्वारे लवकरच दहावी आणि बारावीचे पहिल्या सत्राचे निकाल लवकरच जाहीर केले जाऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे सीबीएसई दहावी बारावीच्या प्रथम सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यानच घेण्यात आली होती. दहावी आणि बारावीचे निकाल एकाच दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी घोषित केले जाण्याची अपेक्षा आहे. हे गुणपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थाळाला भेट देऊन तिथे आपला हजेरी क्रमांक आणि आपल्या शाळेचा क्रमांक नोंदवावा लागेल.

निकाल तपासण्यासाठी हे विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in ना भेट देऊ शकतात.

CBSE 10th, 12th Term 1 Result: कसा तपासावा निकाल ?

>> अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.

>> यानंतर तुम्हाला एका दुसऱ्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले

>> येथे दहावी/बारावी हा पर्याय निवडावा.

>> येथे तुम्हाला तुमचा हजेरी क्रमांक, शाळेचा क्रमांक आणि प्रवेशपत्रावर नोंद असलेली तुमची जन्म तारिख भरावी.

>> आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. तुम्ही हा निकाल डाउनलोड देखील करू शकता.

बरेचदा असं झालं आहे की निकालाच्या दिवशी जास्त गर्दीमुळे या वेबसाइट्स योग्य पद्धतीने काम करत नाहीत. अशावेळी तुम्ही डीजीलॉकर किंवा उमंग हे अ‍ॅपसुद्धा वापरू शकता. तसेच एसएमएस सुविधेच्या माध्यमातूनही तुम्ही निकाल जाणून घेऊ शकता.

CBSE 10th, 12th Term 1 Result: एसएमएसच्या माध्यमातून निकाल कसा जाणून घ्यावा?

>> तुमच्या फोनमधील मेसेज अ‍ॅपमध्ये जावं.

>> cbse 10 किंवा cbse 12 टाईप करून स्पेस देऊन तुमचा हजेरी क्रमांक लिहावा.

>> हा मेसेज ७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवावा.

>> निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल एसएमएसवर मिळेल.

CBSE 10th, 12th Term 1 Result: डीजीलॉकरच्या माध्यमातून निकाल कसा जाणून घ्यावा?

>> डीजीलॉकर या ऑनलाइन पोर्टलला भेट द्यावी.

>> होमपेजच्या डावीकडील कोपऱ्यात साइन अप हा पर्याय असेल त्यावर क्लिक करावे.

>> तुमचे आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाईल नंबर, इमेल आयडी, आधारकार्ड नंबर ही माहिती भरल्यानंर ६ क्रमांकांची पिन तयार करावी.

>> ही माहिती दिल्यावर युजरनेम तयार करावे. डीजीलॉकरवर तुमचे अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्ही सीबीएसई निकाल २०२१ पाहू शकता.

>> यानंतर शिक्षण या टॅबवर जाऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळावर क्लिक करावे.

>> वर्ग दहावी/बारावी निकाल यावर क्लिक करावे.

>> येथे तुमचा हजेरी क्रमांक किंवा मंडळाकडे नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाकावा.

>> यानंतर तुमच्या स्क्रीनवर सीबीएसईचा निकाल दिसेल.

पहिल्या सत्राच्या परीक्षेचा निकाल उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या स्वरूपात प्रसिद्ध केला जाईल. परीक्षा दिलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला पास किंवा नापास घोषित केले जाणार नाही. मंडळाद्वारे १४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत नोटीसनुसार कोणत्याही विद्यार्थ्याला पास, कंपार्टमेंट किंवा एसेंशिअल रिपीटच्या श्रेणीत ठेवले जाणार नाही. इयत्ता दहावी बारावीचे अंतिम निकाल दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यावर जाहीर केले जाईल.

The post CBSE 10th, 12th Term 1 Result: ‘या’ वेबसाइट्सला भेट देऊन तपासू शकता निकाल appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: CBSE 10th, 12th Term 1 Result: ‘या’ वेबसाइट्सला भेट देऊन तपासू शकता निकालhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या