Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ६ जानेवारी, २०२२, जानेवारी ०६, २०२२ WIB
Last Updated 2022-01-06T10:00:48Z
Rojgar

IBPS PO प्रिलिम्सचा निकाल जाहीर, 'येथे' तपासा

Advertisement
Result 2021: आयबीपीएस पीओ प्रिलिम्स २०२१ (IBPS PO Prelims 2021 Result) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इंस्टिट्यूट ऑफ बॅंकींग पर्सोनेल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection, IBPS) ने सहभागी बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनी, सीआरपी पीओ (Probationary Officers/ Management Trainees in Participating Banks, CRP PO/MT-XI)चे निकाल अधिकृत वेबसाइट ibps.in वर प्रसिद्ध केले आहेत. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार पोर्टलवर आवश्यक तपशील भरुन त्यांचे गुण तपासू शकतात. उमेदवार बातमीखाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. आयबीपीएस पीओ प्रिलिम्स निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ ला भेट द्या. नंतर 'CRP-PO/MT >> प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी -XI साठी सामान्य भरती प्रक्रिया' या लिंकवर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. त्यानंतर 'IBPS PO-XI साठी प्राथमिक निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा' वर क्लिक करा. आता तुमचे युजर नेम / नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड / जन्मतारीख भरा. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. PO प्रिलिम्स परीक्षा ११ वी आवृत्ती ४ आणि ११ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन यूजर आयडी, नाव आणि पासवर्डसारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून त्यांचा निकाल पाहता येणार आहे. ११ जानेवारीनंतर लिंक काढून टाकली जाईल. निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. मुलाखती १०० गुण देण्यात आले आहेत. या अंतर्गत, मुलाखतीतील किमान पात्रता गुण ४० टक्क्यांपेक्षा कमी नसावेत. याव्यतिरिक्त एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी ते ३५ टक्के असेल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ibps-po-prelims-result-2021-declaired-check-result-on-website/articleshow/88730921.cms