IGNOU मध्ये तीन नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात, जाणून घ्या तपशील

IGNOU मध्ये तीन नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात, जाणून घ्या तपशील

New Courses: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) या आठवड्यात तीन नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थद्वारे ओडीएल माध्यमातून एमए इन एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ ऑनलाइन माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. यासोबतच स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (SOMS) इग्नूतर्फेने ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे () द्वारे मान्यताप्राप्त ऑनलाइन MBA अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. . ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्यास थेट प्रवेश स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (SOMS) ने मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (ऑनलाइन MBA) ऑनलाइन प्रोग्राम सुरू केला आहे. AICTE मान्यताप्राप्त एमबीए (ऑनलाइन) अभ्यासक्रम जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. खुल्या वर्गासाठी ५० टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांसह ग्रॅज्युएट उमेदवार कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ignuiop.samarth.edu.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना ५ वेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येणार आहे. ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट(Human Resource Management),फायनान्शियल मॅनेजमेंट (Financial Management), मार्केटींग मॅनेजमेंट (Marketing Management), ऑपरेशन्स मॅनेजमेंट (Operations Management), सर्व्हिस मॅनेजमेंट (Services Management)या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. इग्नूतर्फे एकूण २८ अभ्यासक्रम चार सेमिस्टरमध्ये पूर्ण केले जाणार आहेत. जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार एमबीए ऑनलाइन प्रोग्रामसाठी अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती डिजिटली काऊन्सेलिंग, मोबाइल अॅप, ई-मेल यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे दिली जाणार आहे. हे अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून कमाल कालावधी चार वर्षांचा आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महागड्या फीमुळे कोर्स करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोर्सचा लाभ घेता येणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-new-courses-ignou-launches-three-new-courses-aicte-approved-online-mba/articleshow/88891060.cms

0 Response to "IGNOU मध्ये तीन नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात, जाणून घ्या तपशील"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel