
Course: इग्नूने (IGNOU) ने यूजी आणि पीजीचे विविध कोर्स सुरु केल्यानंतर आता दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इग्नूतर्फे आणि अभ्यासक्रम सुरु होत आहेत. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) च्या स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन सायन्सेसद्वारे आयोजित केले जाणारे अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून शिकविले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ignuiop.samarth.edu.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. इग्नूने जाहीर केलेल्या माहितीनुसार, हा अभ्यासक्रम एक-सेमिस्टरचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहेत. या अंतर्गत पहिल्या सत्रात कॉम्प्युटर सायन्स विषयातील थेअरी आणि प्रॅक्टीकल स्किल डेव्हलपमेंट यावर भर दिला जाईल. यानंतर दुसरे वर्ष प्रोजेक्ट कामासह अॅडव्हान्स कोर्सवर आधारित असेल. इग्नू (IGNOU) मधून एमसीए (MCA) आणि बीसीए (BCA) साठी फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3zsTCI1 ला भेट द्या. 'नवीन नोंदणी फॉर्म'मध्ये आवश्यक तपशील भरा. आता तुमचे यूजर आयडी, नाव आणि पासवर्ड मिळवण्यासाठी 'नोंदणी करा' वर क्लिक करा. लॉगिन करताना ही माहिती क्रेडेन्शियल्स सेव्ह करा. आधीच नोंदणी केली असेल तर https://ift.tt/3ixGuuN येथे 'लॉगिन' बटणावर क्लिक करा. त्यानंतर फी भरा. उमेदवार क्रेडिट कार्ड (मास्टर/व्हिसा), डेबिट कार्ड (मास्टर/व्हिसा/रुपे), नेटबँकिंगच्या माध्यमातून शुल्क भरु शकतात. कागदपत्रे अपलोड करुन फॉर्म पूर्णपणे तपासल्यानंतर पुढील बटणावर क्लिक करा. यानंतर तुमचा फॉर्म सेव्ह करा आणि भविष्यातील उपयोगासाठ प्रिंटआउट घ्या. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
source https://maharashtratimes.com/career/career-news/now-do-online-from-ignou-bca-mca-there-is-a-chance-of-registration-till-31-january-2021/articleshow/88731901.cms
0 टिप्पण्या