TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IIFT तात्पुरती उत्तरतालिका जाहीर, 'या' स्टेप्स फॉलो करुन तपासा

answer key 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आयआयएफटी २०२२ (IIFT 2022) तात्पुरती उत्तरतालिका (provisional answer key) जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- iift.nta.nic.in वर जाऊन IIFT उत्तरतालिकेची पीडीएफ डाउनलोड करू शकतात. आयआयएफटी उत्तरतालिका २०२२ () डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड हे लॉगिन क्रेडेंशियल भरावे लागेल. IIFT 2022: अशी करा डाऊनलोड आयआयएफटी एनटीए २०२२ (IIFT NTA) ची अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जा. 'IIFT MBA (IB) Answer Key 2022' या टॅबवर क्लिक करा. उमेदवारांना एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे उमेदवारांना त्यांचा आयआयएफटी २०२२ (IIFT 2022) अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरल्यावर एक नवीन पेज उघडेल जेथे उमेदवारांना एनटीए आयआयएफटी ( NTA IIFT) उत्तरतालिकेच्या टॅबवर क्लिक करा. आयआयएफटी २०२२ तात्पुरती उत्तरतालिका कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल. आपली उत्तरे जुळवा. आयआयएफटी उत्तरतालिका २०२२ मध्ये उमेदवारांना यामध्ये काही विसंगती आढळल्यास उमेदवार त्याविरुद्ध आक्षेप नोंदवू शकतात. आयआयएफटी २०२२ उत्तरतालिकेसंदर्भात आक्षेप नोंदवताना प्रति प्रश्न १ हजार रुपये आक्षेप शुल्क म्हणून भरावे लागतील. उमेदवार त्यांची उत्तरे तात्पुरत्या आयआयएफटी उत्तरतालिकेशी जुळवून आयआयएफटी रॉ स्कोअर मोजा. आयआयएफटी एमबीए उत्तर तालिका (IIFT MBA (IB) Answer Key) वर समाधानी नसलेले उमेदवार यावर आक्षेप नोंदवू शकतात. एनटीएने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी आयआयएफटी परीक्षा आयोजित केली होती. ओडिशा, पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये परीक्षा उशिराने सुरू होती. उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर आक्षेप विचारात घेऊन अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/iift-answer-key-2022-iift-provisional-answer-key-released/articleshow/88728054.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या