Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १९ जानेवारी, २०२२, जानेवारी १९, २०२२ WIB
Last Updated 2022-01-19T08:00:56Z
Rojgar

Maharashtra NEET Counselling 2021: पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी आज

Advertisement
नवी दिल्ली: महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आज अधिकृत वेबसाइटवर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०१ च्या पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करेल. राज्याच्या नीट यूजी काऊन्सेलिंगच्या वेळापत्रकानुसार राऊंड १ तात्पुरती गुणवत्ता यादी आज १९ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जाहीर होऊ शकते. उमेदवार अधिकृत वेबसाइट - cetcell.net वर जाऊन यादी पाहू शकतात. एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२१ आयोजित केले जात आहे. संध्याकाळी ६ वाजता गुणवत्ता यादीपूर्वी पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील नोंदणीकृत उमेदवारांची सर्वसाधारण यादी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. गुणवत्ता यादी (Merit List) किंवा तात्पुरती वाटप (Provisional allotment) तपासण्यासाठी उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकतात. निकाल आल्यानंतर लगेचच थेट लिंक अपडेट केली जाईल. नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ : महत्वाचे वेळापत्रक नीट यूजी काऊन्सेलिंग फर्स्ट राउंड : १९ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी जॉइनिंगसाठी शेवटची तारीख : ४ फेब्रुवारी २०२२ दुसरा राउंड : ९ फेब्रुवारी २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२२ जॉइनिंगची शेवटची तारीख : २६ फेब्रुवारी २०२२ मॉप-अप राउंड : २ मार्च २०२२ ते ११ मार्च २०२२ जॉइनिंगची शेवटची तारीख: १९ मार्च २०२२ महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग: अशी तपासा गुणवत्ता यादी उमेदवारांनी यूजी अभ्यासक्रमांसाठी स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलची अधिकृत वेबसाइट cetcell.net वर जा. होमपेजवर 'राऊंड १ तात्पुरती गुणवत्ता यादी' लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंगची गुणवत्ता यादी तपासण्यासाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सक्रिय होईल.) तुमचे लॉगिन तपशील भरा. तुमची फेरी १ मेरिट लिस्ट किंवा प्रोविजनल अलॉटमेंट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट डाउनलोड करा. तात्पुरत्या गुणवत्ता यादीनंतर, उमेदवारांनी महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२१ साठी प्रवेश प्रक्रियेसाठी पुढे जा. यानंतर चॉईस फिलिंग आणि CAP फेरी १ देखील असेल. या कागदपत्रांची आवश्यकता नीट काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना नीट यूजी २०२१ स्कोअर कार्ड, नीट यूजी २०२१ प्रवेशपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), PwD (लागू असल्यास) आणि इतर यासारखी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ द्वारे, ८३,०७५ एमबीबीएस, २६,९४९ बीडीएस, ५२,७२० आयुष, १,८९९ एम्स आणि २४९ जिपमर एमबीबीएस जागांसाठी प्रवेश दिले जातील.


source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-neet-counseling-2021-important-update-on-round-1-merit-list-for-ug-courses/articleshow/88988781.cms