Advertisement

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत () २३ जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नसून, ती नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे ''ने जाहीर केले आहे. ही परीक्षा पुढे गेल्याची चुकीची माहिती काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे 'एमपीएससी'ने एका ट्विटद्वारे सांगण्यात आले आहे. 'एमपीएससी'मार्फत डिसेंबर महिन्यात जानेवारी २०२२ पासून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानंतर दोन जानेवारीला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरातही प्रसिद्ध केली होती. परंतु, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही परीक्षा 'एमपीएससी'मार्फत पुढे ढकलण्यात आली. दोन ऐवजी २३ जानेवारीला या परीक्षा होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र, ही परीक्षा २३ जानेवारीवरून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही माध्यमांमधून प्रसिद्ध होत होती. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाकडे विचारणा केली. त्यानुसार आयोगाने नुकतेच याबाबत एक ट्विट केले आहे. राज्य सेवा पूर्वपरीक्षा २३ जानेवारीलाच होणार असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करोना प्रादुर्भावामुळे दीड वर्षात 'एमपीएससी'मार्फत आयोजित परीक्षा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. २०२२ मध्ये तरी या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील अशी आशा असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच जवळपास तीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नाराजीचे वातावरण होते. त्यातच २३ जानेवारीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परंतु आयोगामार्फत तातडीने हा गैरसमज दूर करण्यात आला आहे. हेही वाचा:
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-prelim-exam-will-be-on-23-january-only-no-change-in-date-sheet/articleshow/88965211.cms