TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Nagpur School Update: नागपूरमधील शाळा ऑफलाइन की ऑनलाइन? आज निर्णय

Update: नागपूर जिल्ह्यातील शाळा अद्याप ऑफलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. राज्यातली करोना संक्रमणाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा पुन्हा ऑनलाइन पद्धतीने सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय शिक्षक पालक संघाने केली आहे. या शाळांबाबत बुधवार सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनची धास्ती आणि करोनाबाधितांची वाढत जाणारी संख्या यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्यावर पालक फेरविचार करीत आहेत. लहान मुले शाळांमध्ये करोनाबाबतची काळजी घेऊ शकणार नाहीत, याची भीती पालकांमध्ये आहे. त्यामु‌ळे शाळेत पाठविण्यापेक्षा पालक ऑनलाइनला पसंती देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा एकदा रोडावली आहे. करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि आरोग्य यांच्यादृष्टीने शाळा सुरू ठेवण्याबाबात प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या चार दिवसांपासून वाढ होत आहे. सोमवारी जिल्ह्यात तब्बल १३३ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यात चार ओमायक्रॉन बाधितांचा समावेश होता. त्यामुळे शहरात आतापर्यंत १० ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी ८१ तर, रविवारी ९० बाधित होते. सहा महिन्यांहून अधिक कालावधीनंतर जिल्ह्यात दिवसभरात तिहेरी संख्येत बाधितांची नोंद झाली आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/nagpur-school-update-decision-about-nagpur-schools-likely-to-be-announced-today/articleshow/88704880.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या