Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२, जानेवारी ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-01-07T06:00:42Z
Rojgar

NBE FDST admit card 2022: फॉरेन डेंटल स्क्रीनिंग टेस्टसाठी प्रवेशपत्र जाहीर

Advertisement
NBE : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने FDST प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. NBEMS तर्फे ११ जानेवारी २०२२ रोजी बीडीएस पदवीधरांसाठी (FDST) आयोजित केली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राची प्रिंट आउट सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आणि इमेलवर एसएमएस/ई-मेल सूचना देखील पाठवण्यात आली आहे. प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा. 'NBMS प्रवेश परीक्षा आणि स्क्रीनिंग चाचणी' या बटणावर क्लिक करा. त्यानंतर 'FDST' बटणावर क्लिक करा. आता अॅप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा. त्यानंतर स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या. महत्वाच्या बाबी प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये दिलेल्या माहितीमध्ये कोणतीही त्रुटी नसेल याची खात्री करुन घ्या. काही त्रुटी लक्षात आल्यास विभागाकडून ती दुरुस्त केली जाऊ शकते. प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या रकान्यात पासपोर्ट आकाराचा कलर फोटो चिकटवा. फोटोचा बॅकग्राऊंड सफेद असावा. कोणत्याही दागिन्याविना पूर्ण चेहरा दिसावा. फोटो स्क्रॅच किंवा खराब नसेल याची उमेदवारांनी काळजी घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/nbe-fdst-admit-card-2022-admit-card-for-foreign-dental-screening-test-released-download-here-easily/articleshow/88748191.cms