
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरोग्य विज्ञानाच्या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १७ जानेवारीपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. आरोग्यशास्त्राच्या एमडी, एमएस, डिप्लोमा या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील नीट पीजी ही प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे संबंधित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. NEET प्रवेश परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना MBBS मध्ये १५ टक्के जागा आणि MS, MD अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ५० टक्के जागा अखिल भारतीय कोट्यातून भरल्या जातात. नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगलाठी १२ ते १७ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. १८ जानेवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. २० ते २१ जानेवारी दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. २२ जानेवारी रोजी निकाल लागणार असून २३ ते २८ जानेवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे. नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगच्या राऊंड २ साठी ३ ते ७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. १० ते ११ दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. राऊंड २ चा निकाल १२ फेब्रुवारी २०२२ रोजी लागणार असून उमेदवारांना १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे. अशी करा नोंदणी - नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंग अधिकृत वेबसाइट वर जा आणि नोंदणी लिंकवर क्लिक करा. -नाव, जन्मतारीख, रोल नंबर, नीट पीजी २०२१ नोंदणीकृत कोड, सिक्युरीटी कोड यासारखे तपशील सबमिट करा. -नीट पीजी काऊन्सेलिंग लॉगिन क्रिडेन्शियल भरुन लॉगिन करा. -लॉगिन केल्यानंतर पालकांचा तपशील, संपर्क, ग्रेड आणि राष्ट्रीयत्व आदि माहिती भरा. -नीट पीजी २०२१ अर्ज क्रमांक आणि रोल नंबर भरा. -श्रेणीनिहाय नोंदणी शुल्क भरा. -फी भरल्यानंतर त्याची नोंदणी स्लिप तयार होईल. -नोंदणी स्लिप डाउनलोड करा आणि स्लिपची प्रिंटआउट घ्या. सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी २०२१ मध्ये ओबीसी आरक्षण आणि इडब्ल्यूएस कोट्यावर निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १० टक्के आरक्षणाची वैधता कायम ठेवली. याचिकेत इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आरक्षण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय कोट्यातील जागांवर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-pg-counselling-2021-registration-begins-at-mcc-nic-in/articleshow/88868685.cms
0 टिप्पण्या