TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NEET PG Counselling Dates Released: वेळापत्रक जाहीर, प्रवेश प्रक्रिया आणि अन्य तपशील जाणून घ्या

NEET PG Counselling Date: राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा पदव्युत्तर अर्थात नीट पीजी (NEET PG) समुपदेशन २०२१ ची प्रक्रिया १२ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवार, ०९ जानेवारी रोजी नीट समुपदेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की नीट समुपदेशन बुधवार, १२ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल.

७ जानेवारी २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने नीट पीजी समुपदेशन २०२१ (NEET PG 2021 Counselling) ला ग्रीन सिग्नल दिला होता. न्यायालयाच्या अंतरिम निर्णयानुसार ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले. त्याच वेळी, यावर्षी EWS साठी १० टक्के आरक्षण प्रभावी ठेवण्याचे मान्य करण्यात आले. मात्र, भविष्यात हा कोटा कायम ठेवायचा की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. यासाठी या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मार्च रोजी होणार आहे.

नीट पीजी २०२१ ची समुपदेशन प्रक्रिया ऑक्टोबर २०२१मध्ये सुरू होणार होती, परंतु OBC आणि EWS कोट्याच्या तरतुदींशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या स्थगिती आदेशामुळे ती लांबली आहे. या खटल्याला झालेल्या विलंबामुळे देशभरातील कनिष्ठ आणि निवासी डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला.

The post NEET PG Counselling Dates Released: वेळापत्रक जाहीर, प्रवेश प्रक्रिया आणि अन्य तपशील जाणून घ्या appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: NEET PG Counselling Dates Released: वेळापत्रक जाहीर, प्रवेश प्रक्रिया आणि अन्य तपशील जाणून घ्याhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या