Advertisement

NEET PG Counseling: नीट पीजी परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी 'मॉप-अप' काऊन्सेलिंग आणि 'स्ट्रे व्हॅकन्सी राउंड' घेण्याची विनंती इंडियन मेडिकल असोसिएशन () ने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली. आयएमएने गुरुवारी यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले. उमेदवारांनी त्यांची पदवी परीक्षा उत्तीर्ण करुन मूलभूत पात्रता निकष पूर्ण केले आहेत. तसेच देश वैद्यकीय क्षेत्रातील गंभीर परिस्थितीतून जात असून वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही पद रिक्त ठेवण्याचा धोका पत्करता येणार नाही. 'उपलब्ध आकडेवारीनुसार कट ऑफपेक्षा जास्त उमेदवार निवडले जात नसल्याने अनेक पदव्युत्तर जागा दरवर्षी रिक्त राहतात' असे डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. नामांकित सरकारी महाविद्यालयांमध्येही पॅराक्लिनिकल आणि मूलभूत विषयांच्या जागा रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताला खूप तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. इच्छुक उमेदवार प्रवेश मिळण्याची वाट पाहत असतात पण पात्रतेच्या निर्बंधांमुळे ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणतीही जागा रिक्त नाही हे लक्षात घ्यायला हवे, अशी माहिती आयएमएने दिली. आव्हानात्मक काळात नवीन उपाययोजना करण्यासाठी डॉक्टरांची गरज असते. अशावेळी कट ऑफची अट शिथिल करायला हवीआणि नीट रँकिंगचा वापर करून पात्र असलेल्या इतर सर्व उमेदवारांना प्रवेश दिला जावा. साथीच्या रोगाचा विचार करता यावर्षी हा एक-वेळचा उपाय केला जाऊ शकतो असे आयएमएने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-pg-exam-ima-said-the-candidates-of-neet-pg-exam-should-be-included-in-mop-up-counseling/articleshow/89172347.cms