
Pariksha Pe Charcha 2022: परिक्षा पे चर्चा साठी नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहे.त्यामुळे यासाठी अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आणखी एक संधी आहे. दिलेल्या लिंकवर जाऊन ते ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नोंदणी करू शकतात. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. MyGov वेबसाइटनुसार, आतापर्यंत ११.७७ लाखांहून अधिक विद्यार्थी, २.६५ लाख शिक्षक आणि ८८ हजार पालकांनी PPC २०२२ कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. परीक्षा पे चर्चा हा भारत सरकारचा वार्षिक कार्यक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. विद्यार्थी उपलब्ध स्पर्धांपैकी कोणत्याही एका स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.‘परीक्षा पे चर्चा' मध्ये फक्त इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेव्यतिरिक्त विद्यार्थी कमाल ५०० शब्दांमध्ये पंतप्रधानांना एक प्रश्न पाठवू शकतात. अर्ज यशस्वीपणे जमा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी झाल्याचे एक डिजिटल प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. हे सर्टिफिकेट विद्यार्थी '#PPC2022' सह सोशल मीडिया पर डाउनलोड करून पोस्ट करू शकतील. गेल्या वर्षी २.६२ लाख शिक्षक आणि ९३ हजार पालकांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला होता. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात. ‘परीक्षा पे चर्चा' किट या स्पर्धेतील विजेत्यांना एनसीईआरटीच्या संचालकांचे प्रशंसापत्र दिले जाईल. सोबतच त्यांना पंतप्रधानांद्वारे लिखित हिंदी आणि इंग्रजीतील परीक्षा योद्ध्यांची पुस्तके असलेले परीक्षा पे चर्चा किट देखील दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा फोन नंबरद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. असा करा अर्ज सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिकृत वेबसाइट mygov.in किंवा innovateindia.mygov.in ला वर जा. त्यानंतर 'पार्टिसिपेट नाऊ' बटणावर क्लिक करा. सहभागींच्या त्यांच्या आवडीनुसार लॉगिन पर्यायावर क्लिक करा. कारण विद्यार्थी, विद्यार्थी (शिक्षकाद्वारे), शिक्षक आणि पालक म्हणून लॉग इन करण्याचे पर्याय आहेत. उमेदवार त्यांचा मोबाइल नंबर किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करू शकतात आणि मोबाइल किंवा ईमेलमध्ये प्राप्त झालेला OTP टाइप करून लॉग इन करू शकतात.
source https://maharashtratimes.com/career/career-news/pariksha-pe-charcha-2022-registration-date-extended-till-3-february-for-discussion-on-examination-know-how-to-apply/articleshow/89171380.cms
0 टिप्पण्या