Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १२ जानेवारी, २०२२, जानेवारी १२, २०२२ WIB
Last Updated 2022-01-12T05:43:14Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

एसबीआयच्या ‘सीबीओ’ भरतीचे प्रवेशपत्र घेतले का ? असे करा डाउनलोड… Rojgar News

Advertisement
SBI RECRUITMENT

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO)च्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र (SBI CBO Admit Card 2022) डाउनलोड करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे (SBI CBO भर्ती 2021) एकूण 1226 पदांची भरती केली जाणार आहे. परीक्षेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध अधिसूचनेद्वारे पाहता येईल.

एसबीआयने जाहीर केलेल्या पदांमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ९ डिसेंबर २०२१ रोजी सुरू झाली होती.

असे डाउनलोड करा प्रवेशपत्र

*प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम sbi.co.in ला भेट द्या.

*वेबसाईटच्या होम पेजवर, Current opening वर क्लिक करा.

*आता RECRUITMENT OF CIRCLE BASED OFFICERS – ADVERTISEMENT NO. CRPD/ CBO/ 2021-22/19 च्या लिंकवर जा.

*त्या ठिकाणी Online Exam Call Letterच्या लिंकवर क्लिक करा.

*उमेदवाराने त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकवा.

*सबमिट केल्यानंतर, प्रवेशपत्र दिसेल.

* प्रवेशपत्र डाउनलोड करा गरजेनुसार त्याची प्रत काढा.

रिक्त जागा अशा

गुजरात- 354

कर्नाटक – 278

तामिळनाडू- 276

मध्य प्रदेश- 162

राजस्थान- 104

छत्तीसगड- 52

निवड प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) भरतीमधील उमेदवारांची निवड एकूण तीन फेऱ्यांमध्ये केली जाईल. पहिली फेरी ऑनलाइन लेखी परीक्षा, दुसरी फेरी स्क्रीनिंग आणि तिसरी फेरी मुलाखत असेल. प्रत्येक फेरीत, परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अंतिम निवडीसाठी उमेदवारांना ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्क्रीनिंग राउंड पास करावे लागेल.

इतर बातम्या :

कामाची बातमी! मार्कशीट, डिग्रीचा कागद जपून ठेवायची चिंता कायमची संपली? होय, खरंच!

राज्यात 2021 मध्ये स्कील डेव्हलपमेंटमधून 2.19 लाख जणांना रोजगार, नवाब मलिक काय म्हणाले? वाचा सविस्तर

bank of baroda recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: एसबीआयच्या ‘सीबीओ’ भरतीचे प्रवेशपत्र घेतले का ? असे करा डाउनलोड…https://ift.tt/321G0a8