TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

TET Scam: बोगस शिक्षक शोधण्यासाठी परीक्षा परिषदेची मोहीम; बनावट प्रमाणपत्रांचा घेणार शोध

म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे २०१३ पासून देण्यात आलेल्या टीईटी उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. या काळात बोगस प्रमाणपत्र (fake certificates) दिली गेली असल्याची शक्यता व्यक्त करून परीक्षा परिषदेने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर देण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या टीईटी उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आल्याने तुकाराम सुपेसह आणखी काही जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शिक्षकांकडे टीईटी उत्तीर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे बोगस शिक्षक शोधण्यासाठीच परीक्षा परिषदेने ही मोहीम हाती घेतली आहे. हे काम अती तातडीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले की, '१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या माहिती आणि मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी सात जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वीही २०१९ मध्ये प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी काही प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे काम अद्याप सुरू आहे. यंदा हे काम अती तातडीने करण्यात येणार आहे.' परीक्षा परिषदेने सुरू केलेल्या मोहिमेद्वारे बोगस प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवलेल्या शिक्षकांना शोधण्याचा प्रयत्न आहे. बोगस प्रमाणपत्र असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हेही वाचा


source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-paper-leak-scam-msce-pune-to-search-for-fake-certificates/articleshow/88725783.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या