Advertisement

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या 'असिस्टंट कमांडंट'पदाच्या परीक्षेचा () निकाल नुकताच जाहीर झाला. यात मिरा रोडच्या या २८ वर्षीय तरुणीने देशात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. भावनाने मिरा-भाईंदर शहराचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केल्याने तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. भावना मूळची सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील. तिचे वडील सुभाष यादव मुंबई पोलिस दलात सहायक फौजदार असून, सध्या ते बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. भावनाचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाले. मागील काही वर्षांपूर्वी यादव कुटुंबीय मिरा रोडमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर भावनाने १०वीपर्यंतचे शिक्षण येथील शांतिपार्क येथील सेंट झेवियर्स शाळेतून पूर्ण केले. पुढे विरारच्या विवा कॉलेजमध्ये तिने एमएससीपर्यंत शिक्षण घेतले. भावनाला लहानपणापासूनच केंद्रीय सेवेत जाण्याची इच्छा असल्याचे तिने २०१५पासून यूपीएससीची परीक्षा देण्यास सुरुवात केली. दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा ती दोन वेळा उत्तीर्ण झाली होती. मात्र मैदानी चाचणीत तिला अपयशाला सामोरे जावे लागले. भावना याआधीही केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची उत्तीर्ण झाली होती. मात्र त्यावेळीही तिला मैदानी परीक्षेत अपयश आले होते. यावेळी मात्र तिने बाजी मारली. ही परीक्षा २०२० मध्ये घेण्यात आली होती. ४ जानेवारीला तिचा निकाल जाहीर झाला. परीक्षेत देशभरातील एकूण विद्यार्थी १८७ उत्तीर्ण झाले आहेत. यात भावना १४व्या क्रमांकावर आहे. ती देशात मुलींमध्ये पहिली आली असून, महाराष्ट्रातील ती एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे. लवकरच पुढील प्रशिक्षणासाठी ती हैदराबादला जाणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/bhavna-yadav-from-mira-road-mumbai-stood-first-in-girls-in-upsc-assistant-commandant-exam/articleshow/88803298.cms