
CDS Exam Pattern: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)तर्फे कम्बाइंड डिफेंस सर्व्हिस (CDS)लेखी परीक्षा पॅटर्नची रुपरेखा तयार केली जात आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. यावर्षी सीडीएस परीक्षेचे आयोजन होणार असून लाखो उमेदवार परीक्षेची तयारी करत आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेआधी परीक्षा पॅटर्न नक्की पाहा. कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस लेखी परीक्षा दोन भागात होते. भारतीय सेना, भारतीय नौसेना आणि वायु सेना अॅकेडमी परीक्षेसाठी साडीएस परीक्षा पॅटर्न तीन विभागामध्ये आयोजित केली जाते. परीक्षा पॅटर्न भारतीय नौसेना अकादमी (Military Academy) आणि वायू सेना (Air Force) अकादमीमध्ये प्रवेश घेताना लेखी परीक्षेत सीडीएस पेपर पॅटर्नमध्ये प्राथमिक गणित, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे तीन विषय असतील. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रवेशासाठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे दोनच विषय असतील. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. याचा कालावधी २ तासांचा असेल. प्रत्येक विषय १०० गुणांचा असेल. इंडियन मिलिटरी अकादमी, नेव्हल अकादमी, एअर फोर्स अकादमीच्या लेखी परीक्षेत उमेदवारांसाठी इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणित हे विषय असतील. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी बसलेल्या उमेदवारांसाठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञानाची लेखी परीक्षा आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित सेवा मुख्यालयाकडून त्यांच्या पसंतीच्या आधारावर सेवा निवड मंडळात बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक मुलाखत चाचणीसाठी बोलावले जाते. एसएसबी प्रक्रियेमध्ये टप्पा १ आणि टप्पा २ अशी दोन टप्प्यांची निवड प्रक्रिया असते. टप्पा १ मध्ये ऑफिसर इंटेलिजेंस रेटिंग (OIR) टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन वर्णन टेस्ट (PP&DT) यांचा समावेश असतो. ओआयआर चाचणी आणि पिक्चर पर्सेप्शन डिस्क्रिप्शन टेस्ट (PP&DT) मधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-cds-exam-pattern-questions-are-asked-in-the-exam-like-this-see-the-complete-exam-pattern/articleshow/88869862.cms
0 टिप्पण्या