TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

UPSC CSE २०२२ परीक्षेला मुदतवाढ देण्याची उमेदवारांकडून मागणी

Exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षेसंदर्भात (UPSC CSE Mains)महत्वाची अपडेट समोर येत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षेला मुदतवाढ देण्याची मागणी परीक्षार्थींकडून होत आहे. यूपीएससी सीएसई (UPSC CSE 2022)७ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. करोनामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून सोशल मीडियावर परीक्षेला मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. उमेदवारांतर्फ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अडचणी परीक्षा मंडळासमोर मांडल्या जात आहेत. परीक्षेसाठी आम्हाला इतर शहरातील परीक्षा केंद्रांवर जावे लागते. वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने परीक्षेत अनेक अडचणी येऊ शकतात असे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे. एका सोशल मीडिया युझर्सने लिहिले की, परीक्षेसाठी बहुतेक उमेदवार दिल्ली शहरात १० दिवस प्रवास करतात. झारखंड ते कोलकाता असा प्रवास करणे, यादरम्यान हॉटेल, खाणे आणि प्रवासादरम्यान संक्रमण वाढण्याची शक्यता असते. तसेच, करोनामुळे आजकाल हॉटेलमधील बुकिंगही बंद आहे. अशावेळी विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकते. जानेवारीमध्ये दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या मेट्रो शहरांमध्ये करोना प्रादुर्भावाच्या काळात १० दिवस राहणे ही मोठी प्रक्रिया आहे. करोना रुग्णसंख्या वाढल्याने येथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. हॉटेलमध्ये राहणे आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करणे अवघड होणार असल्याचे दुसर्‍या युझर्सने सरकारला आवाहन करत लिहिले आहे. अशाप्रकारे अनेक उमेदवार सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करुन सरकारला परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यूपीएससी सीएसई मेन्स ७,८,९,१५ आणि १६ जानेवारी रोजी होणार आहेत. यूपीएससी मेन्समध्ये एकूण नऊ पेपर असतील, त्यापैकी दोन पात्रता (ए आणि बी) आणि सात इतर पात्रतेसाठी आहेत. जे उमेदवार यूपीएससी सीएसई (UPSC CSE) मुख्य परीक्षेच्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. परीक्षेला मुदतवाढ देण्यासंदर्भात आयोगाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी उमेदवार सातत्याने अशी मागणी करत आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-cse-mains-exam-2022-due-to-corona-candidates-are-demanding-postponement-of-upsc-civil-mains-exam/articleshow/88683663.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या