Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ६ जानेवारी, २०२२, जानेवारी ०६, २०२२ WIB
Last Updated 2022-01-06T09:00:36Z
Rojgar

करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर UPSC चा नागरी सेवा मुख्य परीक्षेबाबत मोठा निर्णय

Advertisement
Exam: देशभरात करोना आणि ओमिक्रॉनचा वेग पाहता केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ७ जानेवारी २०२२ रोजी म्हणजेच उद्यापासून सुरू होणार्‍या या परीक्षेच्या संदर्भात यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, देशात मुख्य परीक्षा ७,८,९,१५ आणि १६ जानेवारी २०२२ रोजी नियोजित वेळापत्रकानुसार घेतली जाईल. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची कोणती गैरसौय होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती यूपीएससीने राज्य सरकारांकडे केली आहे. कंटेनमेंट/मायक्रो-कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आवश्यक असल्यास ई-प्रवेशपत्र आणि ओळखपत्र परीक्षेसाठी वापरावे असे सांगण्यात आले आहे. आयोगाने राज्य सरकारला केलेल्या विनंतीनुसार, परीक्षा आयोजित करण्याच्या तारखेच्या किमान एक दिवस आधी म्हणजे ६ जानेवारी ते ९ जानेवारी आणि १४ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सुरळीत असेल याची खात्री करावी. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रावर पोहोचण्यास करण्यात कोणती अडचण येणार नाही. नागरी सेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानुसार उमेदवार/परीक्षा अधिकाऱ्यांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. उमेदवार स्वतःचे सॅनिटायझर पारदर्शक बाटल्यांमध्ये घेऊन जाऊ शकतात. याशिवाय, खोकला, शिंका येणे, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या, ताप जाणवत असलेल्या उमेदवारांना बसण्यासाठी दोन अतिरिक्त परीक्षा कक्ष आहेत. जेणेकरून त्यांची योग्य सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत चाचणी घेता येईल. आयोगाने प्रवेशपत्राचे वाटप आधीच केले आहे. म्हणून, ज्यांनी अद्याप UPSC IAS नागरी सेवा प्रवेशपत्र डाउनलोड केलेले नाही त्यांना अधिकृत वेबसाइटवर शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी त्यांचे प्रवेशपत्र लवकरात लवकर डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता यूपीएससी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. करोना परिस्थितीत परीक्षा केंद्रावर जाणे आणि परीक्षा देणे दोन्ही शक्य नसल्याने विद्यार्थी ही मागणी केली होती. विद्यार्थ्यांकडून गेले अनेक दिवस सोशल मीडियावर सातत्याने मागणी करत आहेत. त्यानंतर आता उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात ६ जानेवारीला म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून सोशल मीडियावर परीक्षेला मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. उमेदवारांतर्फ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अडचणी परीक्षा मंडळासमोर मांडल्या जात आहेत. परीक्षेसाठी आम्हाला इतर शहरातील परीक्षा केंद्रांवर जावे लागते. वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने परीक्षेत अनेक अडचणी येऊ शकतात असे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-took-this-big-decision-regarding-civil-services-main-examination-after-corona-case-increased/articleshow/88728832.cms