Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १० जानेवारी, २०२२, जानेवारी १०, २०२२ WIB
Last Updated 2022-01-10T06:01:03Z
Rojgar

UPSC अंतर्गत विविध पदांची भरती, सरकारी नोकरीचा तपशील जाणून घ्या

Advertisement
UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये अनेक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या अंतर्गत ज्युनिअर मायनिंग जियोलॉजिस्ट (Junior Mining Geologist), ज्युनिअर मायनिंग भूविज्ञान (Junior Mining Geologist), प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer)यासह अनेक पदे भरले जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले सर्व उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदभरती अंतर्गत एकूण ७८ पदांची भरती करण्यात येत आहे. भरतीशी संबंधित अधिक तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इंजिनीअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, ऑपरेशन, मेंटेनन्स, मरीन डिझेल इंजिनचे समस्यानिवारणचा पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. मरीन इंजिनीअरिंग अधिकारी वर्ग २, मर्चेंटाइल मरीन विभागाद्वारे जाहीर करण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसोबत मरीन इंजिनीअरिंग अधिकारी वर्ग १ चा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. अर्ज शुल्क पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोख/ एसबीआयच्या नेट बँकिंग किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट वापरून हे शुल्क भरता येणार आहे. असिस्टंट एडिटर (Oriya)- १ पद असिस्टंट एडिटर (Cost)- १६ पदे इकोनॉमिक ऑफिसर- ४ पदे प्रशासकीय अधिकारी - १ पद मॅकेनिकल मरीन इंजिनीअर - १ पद लेक्चरर-४ पदे सायंटिस्ट'बी'(कागदपत्रे)- २ पदे रसायनशास्त्रज्ञ: ५ पदे ज्युनिअर मायनिंग भूवैज्ञानिक- ३६ पदे रिसर्च ऑफिसर-१ पद असिस्टंट ऑफिसर-७ पदे या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/government-job-upsc-recruitment-2022-vacancy-for-many-posts-including-assistant-editor-assistant-professor/articleshow/88802450.cms