TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

सांगलीच्या धनराज कोळेकरची भरारी, 19 व्या वर्षी इंडियन नेव्हीत अधिकारीपदी निवड, हलगीच्या गजरात मिरवणूक Rojgar News

Dhanraj Kolekar

सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर येथील धनराज कोळेकर (Dhanraj Kolekar) जिद्द व चिकाटीच्या जोरावर 19व्या वर्षी बनला ऑफिसर इंडियन नेव्ही मध्ये कमिशनर ऑफिसर पदी निवड झाल्याने इस्लामपूर (Islampur) येथील धनराज पोपट कोळेकर याची पुष्प वृष्टी करत मिरवणूक काढली. धनराज पोपट कोळेकर याची इंडियन नेव्हीमध्ये (Indian Navy) कमिशनर ऑफिसर पदी निवड झाल्याने आज इस्लामपूर येथील पोलीस स्टेशन ते माधवनगर पर्यंत पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात पुष्प वृष्टी करत मिरवणूक काढली. धनराजचे वडील शिक्षक पोपट कोळेकर यांचे स्नेही मित्र परिवार पोलीस अधिकारी व अनेक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅली मध्ये सहभागी झाले होते. इंडियन नेव्हीत अधिकारी पदावर निवड होणाऱ्या धनराज याचा अभिमान वाटतो, असं वडील पोपट कोळेकर म्हणाले आहेत.

बालवयातच पाहिलं अधिकारी होण्याचं स्वप्न

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या युक्तीप्रमाणे धनराजने बालवयातच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होतेय त्याची सुरवात प्राथमिक शाळेपासून सुरु झाली प्राथमिक शाळेत असताना त्याने अनेक स्पर्धे मध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावत गेला. हे पाहून शिक्षक क्षेत्रात असणारे वडील पोपट कोळेकर यांनी पुढे त्याला औरंगाबाद सैनिकी पॅटर्न अकॅडमी मध्ये पाठवले.ज्या वयात मुले खेळण्यात मग्न असतात त्याच वयात जिद्द व चिकाटीच्या जोरावर धनराज याने इंडियन नेव्ही मध्ये कमिशनर ऑफिसर पर्यत मजल मारली. यामुळे इस्लामपूर शहरासह परिसरातून धनराज याचे कौतुक होत आहे.

मुलाचा अभिमान वाटतो

धनराज कोळेकर यानं दहावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो, असं म्हटलंय. पोपट कोळेकर हे सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलगा धनराज याला लहाणपणापासून खेळाची आवड होती. माझा मुलगा धनराज हा खेळकर वृत्तीचा असून अन्य गोष्टीमध्ये त्याला रस होता. स्काऊट गाईडमध्ये राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहे. एनसीसीमध्येही त्यानं ए बी आणि सी प्रमाणपत्र मिळवलं होतं. दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळाल्यानंतर त्याला औरंगाबाद येथील अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. तिथेही त्यानं चांगले गुण मिळवले. इंडियन नेव्हीची स्पर्धा परीक्षा देत अधिकारीपदी धनराज याची निवड झाली, याबद्दल अभिमान वाटतो असं पोपट कोळेकर म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

Bappi Lahiri | बॉलिवूडचा ‘सोन्या’सारखा गळा हरपला, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

इनोव्हेटीव्ह साताराचं स्पेलिंग अचूक न सांगता येणाऱ्यांनी बोलू नये, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: सांगलीच्या धनराज कोळेकरची भरारी, 19 व्या वर्षी इंडियन नेव्हीत अधिकारीपदी निवड, हलगीच्या गजरात मिरवणूकhttps://ift.tt/9BhNyix

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या