Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १७, २०२२ WIB
Last Updated 2022-02-17T08:43:43Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

भारतीय हवाई दलात अप्रेंटिसच्या 80 जागांवर भरती, नाशिकमध्ये काम करण्याची संधी Rojgar News

Advertisement
JOBS

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलानं (Indian Air Force) 80 अप्रेंटिस पदासाठी अर्ज मगावले आहेत. एअर फोर्स अप्रेंटिस (Apprentice) ट्रेनिंग प्रोग्राम द्वारे अर्ज मागवले आहेत. एअर फोर्स अप्रेंटिस लेखी परीक्षा कोर्सेस 1 एप्रिल पासून सुरु होणार आहे. या प्रोग्रामसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी आहे. ज्या उमदेवारांना अप्रेंटिससाठी अर्ज करायचा आहे ते indianairforce.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. टेक्निकल बिझनेससाठी (Technical Business) एअर फोर्स स्टेशन ओझर येथील अप्रेंटिसला 1 एप्रिलपासून सुरुवात होते. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान राबवली जाणार आहे. एकूण 80 जागांवर अप्रेंटिसची संधी मिळणार असून 7700 रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे.

पदांचा तपशील

मशिनिस्ट (04), शीट मेटल (07), वेल्डर अँड इलेक्शन (06), मेकॅनिक रेडिओ रडार एअरक्राफ्ट (09), कारपेंटर (03), इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट (14), पेंटर जनरल (01), फिटर (26) या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता

इंडियन एअर फोर्स अप्रेंटिस रिक्रुटमेंटसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारानं दहावी आणि बारावी 50 टक्के उत्तीर्ण असणं आवश्यक आहेत. आटीआयचा अभ्यासक्रम 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, उमदेवारांचं वय 14 ते 21 दरम्यान असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड ही लेखी परीक्षा आणि प्रात्याक्षिक परीक्षेनंतर होणार आहे.ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते apprenticeshiindia.gov.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल.

आरबीआयमध्ये 950 जागांसाठी भरती

आरबीआयमध्ये असिस्टंटच्या 950 पदांसांठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरु होणार आहे.आरबीआयच्या वेबसाईटवर भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यास 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. निवड झालेल्या उमदेवारांना देशातील विविध शहरांमध्ये रुजू व्हावं लागेल. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट या पदासाठी अर्ज दाखल करायचा असल्यास तो ऑनलाईन पद्धतीनं सादर करावा लागेल. rbi.org.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची सुविधा 17 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 8 मार्च आहे. आरबीआयकडून या पदांसाठी परीक्षा 26-27 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

VIDEO: संजय राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं म्हणून त्यांना धास्ती वाटतेय; किरीट सोमय्यांचा दावा

बाईपणावर भारी पडतं आईपण? देशमुखांच्या घरात वादळ नाही त्सुनामी, सासू सूनेचं नातं संशयीच?

Indian Air Force invited applications for 8 apprenticeship programme


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: भारतीय हवाई दलात अप्रेंटिसच्या 80 जागांवर भरती, नाशिकमध्ये काम करण्याची संधीhttps://ift.tt/PVeGNBK