TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

AIBE 16 Result 2021-22: ऑल इंडिया बार परीक्षेचा निकाल जाहीर

AIBE 16 2021-22: १६ मध्ये बसलेल्या आणि निकालाची वाट पाहत असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. बार काऊन्सिल ऑफ इंडियाने (BCI) ऑल इंडिया बार एक्झामिनेशन १६ (AIBE 16) निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार AIBE ची अधिकृत साइट allindiabarexamination.com वर त्यांचे निकाल पाहू शकतात. ऑल इंडिया बारची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली. याची उत्तरतालिका ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली. उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी विंडो उघडण्यात आली होती. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) चे संपूर्ण तपशील वेबसाइटवर पाहता येतील. बार काऊन्सिल ऑफ इंडियाने (BCI) जारी केलेल्या सूचनेनुसार, या परीक्षेत बसलेले उमेदवार वेबसाइटवर निवडीचे संपूर्ण तपशील पाहू शकतात. एआयबीई निकाल वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. AIBE 16 चा निकाल असा तपासा स्टेप १- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम allindiabarexamination.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा. जा स्टेप २- त्यानंतर “AIBE 16 Result 2021” या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३- पुढील पेजवर मागितलेली माहिती भरा. स्टेप ४- लॉगिन केल्यावर निकाल तुमच्या समोर येईल. स्टेप ५- डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या निकाल पाहण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सर्व पात्र उमेदवारांना भारतीय न्यायालयात लॉ प्रॅक्टीस करण्यासाठी प्रमाणपत्र (COP) दिले जाईल. उमेदवार अधिक संबंधित तपशिलांसाठी बार काऊन्सिल ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com ला भेट देऊ शकतात. बार काऊन्सिल ऑफ इंडियाविषयी... बार काऊन्सिल ऑफ इंडिया ही भारतातील एक व्यावसायिक नियामक संस्था आहे. जी भारतातील कायदेशीर व्यवसाय आणि कायदेशीर शिक्षणाचे नियमन करते. ही एक स्वायत्त संस्था आहे. ही परिषद व्यावसायिक आचरण, शिष्टाचार आणि कायदेशीर शिक्षणाचे मानके ठरवते. बार काऊन्सिल ऑफ इंडियाची स्थापना वकील कायदा १९६१ च्या कलम ४ अंतर्गत करण्यात आली आहे. ऑल इंडिया बार परीक्षेविषयी... ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE)ही राष्ट्रीय स्तरावरील कायद्याची परीक्षा आहे. भारतात कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रॅक्टीससाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विधी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. याशिवाय अंतिम वर्षाचे विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते.


source https://maharashtratimes.com/career/career-news/aibe-16-result-2021-22-all-india-bar-exam-result-declared-check-here-from-direct-link/articleshow/89337414.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या