Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०६, २०२२ WIB
Last Updated 2022-02-06T10:43:30Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Bank of Maharashtra Recruitment 2022: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदांवर भरती, 48 ते 69 हजार रुपयांच्या पगाराची संधी Rojgar News

Advertisement
JOBS

Bank of Maharashtra Recruitment 2022: मुंबई : पदवीनंतर बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) जनरल ऑफिसरच्या स्केल II च्या 400 तर स्केल III च्या 100 पदांवर भरती सुरु आहे. जनरल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्रमधील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं. अर्जाची तारीख संपल्यानंतर वेबसाईटवरून ही लिंक हटवण्यात येईल. ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनेलच्या (IBPS) प्लॅटफॉर्मवर जावे लागेल.

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी प्रथम बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in वर जा. मुख्य पृष्ठावरील करिअर विभागात जा. त्यामध्ये करंट ओपनिंगच्या लिंकवर क्लिक करा. आता Recruitment of Generalist Officer in Scale II and III लिंकवर क्लिक करा. आता ऑनलाईन अर्ज करा. आता आयबीपीएस पेज ओपन होईल. यामध्ये Click here for New Registration वर नोंदणी करा आणि त्यानंतर अर्ज भरा.

परीक्षा केंद्र

या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रासह देशात बिहारमधील पटना, चंदीगड आणि मोहाली, छत्तीसगडमधील रायपूर, नोएडा, गाझियाबाद आणि दिल्ली एनसीआरचे गुरुग्राम, गोव्यातील पणजी, अहमदाबाद आणि गांधीनगर, झारखंडमधील रांची, कर्नाटकमधील बेंगलुरू, केरळमधील तिरुवनंतपुरम आणि मध्य प्रदेशातील भोपाळ या शाखांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि नागपूर, ओडिशामधील भुवनेश्वरसह अनेक शहरांमध्ये जनरल ऑफिसर पदासाठी परीक्षा घेतली जाईल. भरतीसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

पगाराचा तपशील

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 48,170 रुपये ते 69,810 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. यात मूलभूत वेतन श्रेणी 48,170 रुपये आहे. याशिवाय डीए आणि एचआरए आणि लीज रेंटल यासारख्या सुविधादेखील देण्यात येणार आहे. आपण अधिकृत अधिसूचनेमध्ये संपूर्ण तपशील पाहू शकता.

इतर बातम्या:

स्वातंत्र्योत्तर काळात पहिला राष्ट्रीय दुखवटा कधी जाहीर झाला… काय आहेत नियम….

शेतकऱ्याच असं जुगाड पाहून तुम्हीही होताल अवाक्, तासाभरातच पडीक जमिनही पेरणी योग्य, वाचा सविस्तर

Bank of Maharashtra Recruitment for officer post graduate candidates can apply check details here


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Bank of Maharashtra Recruitment 2022: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदांवर भरती, 48 ते 69 हजार रुपयांच्या पगाराची संधीhttps://ift.tt/nhkOcLB