Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १०, २०२२ WIB
Last Updated 2022-02-09T19:48:19Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

यूपीएससीची तयारी : तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता

Advertisement

विक्रांत भोसले

या आधीच्या लेखामध्ये आपण इंग्रजी भाषेचे आकलन आणि उताऱ्यावरील माहितीचे आकलन या घटकांची तयारी कशी करायची, याची चर्चा केली होती. आज आपण तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता या घटकाची तयारी कशी करायची, हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण २०१५ ते २०२१ मधील  CSAT पेपरमध्ये या घटकाच्या काही उपघटकांवर किती प्रश्न विचारण्यात आले होते हे पाहूया.

वरील तक्त्यावरून हे लक्षात येते की,  Puzzles या घटकावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. या घटकाची तयारी करताना सर्वात प्रथम लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे प्रश्नांचे दिलेल्या माहितीनुसार आणि काठिण्यपातळीनुसार वर्गीकरण करून त्यांचे उत्तर देण्याची रणनीती आखणे. यात पहिला वर्ग म्हणजे खूप माहितीवर आधारित सोपे प्रश्न – या प्रकारच्या उदाहरणांचा पुरेसा अनुभव नसलेले उमेदवार खूप माहिती पाहताच घाबरून जाऊन असे प्रश्न सोडून देतात. परंतु जर पुरेसा सराव केला असेल तर या प्रकारची उदाहरणे सर्वात आधी सोडवली जाऊ शकतात. त्यानंतरचा वर्ग म्हणजे थोडय़ा माहितीवर कठीण प्रश्न – या प्रश्नांचे स्वरूप वरवर पाहता सोपे वाटते आणि माहिती थोडी असल्याने उमेदवारांचा हा गैरसमज होतो की हा प्रश्न सोपा आहे. पण इथे थोडेसे सावध राहण्याची गरज आहे. कारण अशा ठिकाणी नक्कीच शब्दच्छल केला जाण्याची शक्यता असते. त्यानंतरचा वर्ग म्हणजे खूप माहितीवर कठीण प्रश्न – असे प्रश्न आल्यास त्यांना नेहमी शेवटी सोडवावे. आणि शेवटचा वर्ग जिथे थोडय़ा माहितीवर सोपे प्रश्न विचारले जातात तिथे मात्र कमी वेळात अचूक उत्तर देऊन वाचवलेला वेळ कठीण प्रश्नांसाठी वापरावा.

दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की माहितीचे पूर्ण स्वरूप लक्षात आल्याशिवाय उदाहरण सोडवण्यास सुरुवात करू नये. कारण जर पद्धत चुकीची वापरली तर वेळ वाया जाऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे  Puzzles या घटकावरची उदाहरणे एकतर शिस्तबद्ध पद्धतीने माहिती मांडून सोडवता येतात वा  Elimination Method वा  Tally Method (ताळा पद्धत) वापरून सोडवता येतात. कोणती पद्धत कधी वापरायची याचा पुरेसा अंदाज येण्यासाठी पुरेसा सराव करणे गरजेचे आहे.

त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे  Non Verbal Reasoningचा. या घटकामध्ये आकृत्यांचा वापर करून प्रश्न विचारले जातात. यामध्ये एकतर दिलेल्या मालिकेमध्ये शेवटी येणारी आकृती काय असेल हे विचारले जाते वा रिकाम्या ठिकाणी कोणती आकृती अपेक्षित आहे, हे विचारले जाते. हा प्रश्न प्रकार सोपा आहे. मात्र इथे लक्ष केंद्रित करून काम करण्याची गरज असते. अथवा अत्यंत क्षुल्लक चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Judgmental Reasoning या घटकावर दिलेल्या वाक्यावरून काय निष्कर्ष काढला जाऊ शकतो हे विचारले जाते. इथे दिलेल्या वाक्यांचे स्वरूप हे बहुधा जर झ्र् तर या स्वरूपाचे असते. इथे  Syllogism साठी वापरण्यात येणाऱ्या आकृत्यांचा वापर केला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी  Syllogism या घटकाचा पुरेसा अभ्यास होणे गरजेचे आहे.  Syllogism या घटकाचा अभ्यास करताना लक्षात ठेवायची बाब म्हणजे की जे चार प्रकारचे मानक (standard) वाक्ये असतात त्यांच्या सर्व आकृत्या लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि  Non- standard वाक्यांचे  standard वाक्यांमध्ये जेव्हा गरज पडेल तेव्हा रूपांतर करता आले पाहिजे.

Direction Sense Test या घटकावर लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे ज्या व्यक्तीच्या हालचालीबद्दल माहिती दिलेली असते त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वत: आहोत असे समजून आकृती काढणे सोपे जाते. तसेच दिशा रेखाटताना समोर देशाचा नकाशा ठेवला तर काम सोपे होते.

Blood Relations या घटकावरचे प्रश्न एकतर संवाद स्वरूपात असतात वा सांकेतिक चिन्हांचा वापर केलेला असतो. संवाद स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे देताना एकतर स्वत:ला बोलणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवावे किंवा नातेसंबंध दाखवणारा तक्ता डोळय़ासमोर आणावा किंवा नातेसंबंध सांगणारे वाक्य शेवटीकडून वाचून त्यातील नाती सोपी करत जावीत.

Cube या घटकावरील प्रश्न सोडवताना एकतर प्रत्यक्ष  Cube काढून दिलेली माहिती मांडता येते वा आपल्याजवळील खोडरबरलाच  Cube मानून त्यावर माहिती मांडण्याच्या क्लृप्तीचा वापर केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जिथे  Cube उलगडून त्यावर आधारित माहिती दिलेली असते तिथे  Visualisation ची पद्धत कामी येते.

Artificial Language या घटकावरचे प्रश्न सोडवताना दिलेल्या सांकेतिक चिन्हांवर वा इंग्रजी शब्दांवर काय क्रिया केल्या आहेत, हे लक्षात येणे गरजेचे आहे. हे सर्व दिलेल्या माहितीचा अभ्यास केला की लक्षात येईल. मग त्याच क्रिया प्रश्नातील सांकेतिक चिन्हांवर वा इंग्रजी शब्दांवर केल्या की उत्तर अचूक काढता येईल. इथे एक बाब लक्षात ठेवावी ती अशी की केल्या जाणाऱ्या क्रिया या सगळीकडे सारख्याच असायला हव्यात.

Venn Diagram या घटकामध्ये अचूकरीत्या काढलेल्या आकृतीमध्ये दिलेली माहिती मांडून समीकरणे लिहिता येणे आणि नंतर उत्तर काढणे अपेक्षित असते. यासाठी पुरेसा सराव होणे महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने तार्किक क्षमता आणि विश्लेषण क्षमता यातील सर्व महत्त्वाच्या घटकांचा पुरेसा सराव केला तर वर चर्चिलेले मुद्दे लक्षात येतील आणि वेळीच उपयोगी पडणाऱ्या क्लृप्तय़ांची माहितीदेखील होईल. या नंतरच्या लेखामध्ये आपण सामान्य बौद्धिक क्षमता आणि अंकगणित तसेच माहितीचा अर्थ लावणे आणि माहितीचे पर्याप्तीकरण या घटकांची चर्चा करणार आहोत.

The post यूपीएससीची तयारी : तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: यूपीएससीची तयारी : तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमताhttps://ift.tt/oVDiYjy