Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०२, २०२२ WIB
Last Updated 2022-02-01T19:48:42Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

नोकरीची संधी

Advertisement

सुहास पाटील  suhassitaram@yahoo.com

समग्र शिक्षा अभियानांतर्गत (CSS) डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन, दादरा अँड नगर हवेली आणि दमण अँड दीव केंद्रशासित प्रदेश प्रशासन प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी टीचर्सची शॉर्ट टर्म काँट्रक्ट पद्धतीने भरती करणार आहे. ( Advt.No.DNHDD/ SS/ PS- UPS/ STC/ Recruitment एकूण रिक्त पदे – २०७. (१) असिस्टंट टीचर, प्रायमरी स्कूल (इंग्रजी माध्यम) – १३४ पदे (अजा – १९, अज – ९, इमाव – ३६, ईडब्ल्यूएस- १३, खुला – ५७).

पात्रता – (ए) १२ वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि एलिमेंटरी एज्युकेशनमधील २ वर्ष कालावधीचा डिप्लोमा/४ वर्ष कालावधीची डिग्री किंवा २ वर्ष कालावधीचा स्पेशल एज्युकेशन डिप्लोमा.

किंवा १२ वी किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण आणि NCTE रेग्युलेशन्सनुसार २ वर्ष कालावधीचा एलिमेंटरी एज्युकेशन डिप्लोमा.

किंवा पदवी आणि २ वर्ष कालावधीचा एलिमेंटरी एज्युकेशन डिप्लोमा.

किंवा पदवी किमान ५०% गुणांसह आणि बी.एड. उत्तीर्ण

(बी) उमेदवाराने टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट (TET) (राज्य/केंद्र सरकारने घेतलेली परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक.)

(२) अप्पर प्रायमरी स्कूल टीचर (UPS) – ७३ पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – १९, ईडब्ल्यूएस – ७, खुला – २९).

( i)  UPS इंग्रजी माध्यम – इंग्लिश – १० पदे, सायन्स अँड मॅथ्स – १० पदे, सोशल सायन्स – ९ पदे.

( ii)  UPS गुजराती माध्यम – इंग्लिश – २२ पदे.

( iii)  UPS हिंदूी माध्यम – इंग्लिश ४ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २), सायन्स अँड मॅथ्स – ४ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – २, खुला – २).

( iv)  UPS मराठी माध्यम – इंग्लिश – ९ पदे (अजा – २, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३), सायन्स अँड मॅथ्स – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).

एकूण रिक्त पदांच्या ४% जागा पीएच् कॅटेगरीसाठी राखीव.

पात्रता – (ए) बी.ए./बी.एससी./बी.कॉम. आणि २ वर्ष कालावधीचा एलिमेंटरी एज्युकेशन डिप्लोमा.

किंवा बी.ए./बी.एससी./बी.कॉम. किमान ५०% गुणांसह आणि बी.एड. उत्तीर्ण.

किंवा बी.ए./बी.एससी./बी.कॉम. किमान ४५% गुणांसह आणि NCTE रेग्युलेशन्सनुसार बी.एड. उत्तीर्ण.

किंवा १२ वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि ४ वर्ष कालावधीचा  B. El. Ed./ B. A. B. Ed./ B. Sc. Ed./ B. Com. Ed.

किंवा  B.A./ B.Sc./ B.Com. किमान ५०% गुणांसह आणि  B. Ed. (स्पेशल एज्युकेशन) उत्तीर्ण. आणि (बी) उमेदवाराने टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट (TET) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक.

CTET डिसेंबर, २०२१ परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – ३० वर्षे (अजा/अज – ३५ वर्षे, इमाव – ३३ वर्षे, दिव्यांग – ४० वर्षे).

एकत्रित ठोक दरमहा वेतन – असिस्टंट टीचर प्रायमरी स्कूलसाठी रु. २२,०००/-, अप्पर प्रायमरी स्कूल टीचरसाठी रु. २३,०००/-.

निवड पद्धती – पात्र उमेदवारांची आणि अपात्र उमेदवारांची यादी  http://www.ddd.gov.in,  http://www.dnh.gov.in आणि  http://www.diu.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. लेखी परीक्षा दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाईल. लेखी परीक्षेत किमान ४०% गुण मिळविणारे उमेदवार वर्गातील प्रात्यक्षिकांसाठी बोलाविले जातील. ही प्रात्यक्षिके बाहेरगावच्या उमेदवारांसाठी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी आणि स्थानीय उमेदवारांसाठी दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतल्या जातील. दोन्ही पदांसाठी वेगवेगळे अर्ज करावे लागतील.

विहीत नमुन्यातील अर्ज ऑफिशियल संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील ईमेलवर मेल करावेत

samagrashiksha.dnb@gmail.com  किंवा पुढील पत्त्यावर प्रत्यक्ष सादर करावेत.

Office of the Directorate of Education, Fort Area Moti,  Daman’ किंवा DNH District Education Office,  Secretariat,  Silvasal

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२२ (१७.०० वाजेपर्यंत).

भारत सरकार, संरक्षण मंत्रालयांतर्गत मेकॅनिकल इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, अहमदनगर (MIRC) आणि रेकॉर्डस मेकॅनिकल इन्फन्ट्री रेजिमेंट (RMIR), अहमदनगर येथे पुढील ४५ सिव्हिलियन पदांची भरती.

(Employment Notice No. ०१/२०२१) ( क)  टकफउ मधील रिक्त पदे –

(१) कुक – ११ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इंडियन कुकिंगचे ज्ञान व कौशल्य.

(२) वॉशरमन – ३ पदे (खुला).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि मिलिटरी / सिव्हिलियन्सचे कपडे व्यवस्थित धुता येणे व इस्त्री करता येणे आवश्यक.

(३) सफाईवाला (MTS) – १३ पदे (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि सफाईवालाची कामे अवगत असावी व १ वर्षांचा अनुभव.

(४) बार्बर – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि केश कर्तन कामातील कौशल्य व १ वर्षांचा अनुभव.

(५) लोवर डिव्हिजन क्लार्क – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव) (१ पद दिव्यांग कॅटेगरी एचएच / एलडीसाठी राखीव).

(II) RMIR, अहमदनगरमधील रिक्त पदे-

(६) लोवर डिव्हिजन क्लार्क (LDC) – ४ पदे (इमाव – १, खुला – ३).

पात्रता पद क्र. ५ व ६ साठी – १२ वी उत्तीर्ण आणि इंग्लिश टायिपग ३५ श.प्र.मि. (१०,५००  ङऊढऌ) किंवा हिंदूी टायिपग ३० श.प्र.मि. (९,०००  ङऊढऌ) वेगाने संगणकावर करता येणे आवश्यक.

वयोमर्यादा – दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा / अज – ५ वर्षे / माजी सैनिक – मिलिटरी सव्‍‌र्हिस अधिक ६ वर्षे / दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा / अज – १५ वर्षे).

वेतन – पद क्र. (१) कुक, (५) व (६)  LDC साठी पे-मॅट्रिक्स लेव्हल-२ अंदाजे वेतन दरमहा रु. ३१,००० / -. पद क्र. (२) वॉशरमन, (३) सफाईवाला, (४) बार्बरसाठी पे-मॅट्रिक्स लेव्हल-१ अंदाजे वेतन दरमहा रु. २९,००० / -.

निवड पद्धती – हिंदूी / इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा आणि प्रॅक्टिकल व स्किल टेस्ट. लेखी परीक्षा – १५० प्रश्न, १५० गुणांसाठी (उत्तरे फक्त हिंदूी / इंग्रजी भाषेतूनच द्यावयाची आहेत.)

(अ) जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग – २५ प्रश्न; (ब) न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड – २५ प्रश्न; (क) जनरल इंग्लिश – ५० प्रश्न; (ड) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.  LDC पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी  MIRC किंवा  RMIR अशी एकच आस्थापना निवडायची आहे. उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतात.

अर्जाचा विहीत नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २२ जानेवारी २०२२ च्या अंकात पान क्र. १७ वर उपलब्ध आहे.

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज वयाचा / जातीचा / शैक्षणिक अर्हता / टायिपग / अनुभव / दिव्यांगत्व इ.च्या पुराव्यासाठीचे दाखल्यांसोबत पुढील पत्त्यावर दि. १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

Admn Branch ( Civil Section)  HQs,  MIRC,Darewadi, Solapur Road,  Ahmadnagar – ४१४ ११०. अर्जासोबत स्वतचा पत्ता लिहिलेला लिफाफा आवश्यक त्या पोस्टाचा स्टँप लावलेला (कॉललेटर मिळविण्यासाठी) जोडणे आवश्यक.

The post नोकरीची संधी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: नोकरीची संधीhttps://ift.tt/HIY1dLFZq