नोकरीची संधी

नोकरीची संधी

सुहास पाटील

* इंडियन नेव्हीमध्ये अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एन्ट्रीमधील शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन मिळविण्यासाठी स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, (INA) इझिमाला, केरळ येथे कोर्सकरिता प्रवेश

पदाचे नाव –  SSC Executive ( Information Technology) एकूण रिक्त पदे – ५०.

पात्रता – एम.एससी. / बी.ई. / बी.टेक. / एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअिरग / कॉम्प्युटर इंजिनीअरिंग  / इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर सिस्टीम / सायबर सिक्युरिटी / सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्किंग / कॉम्प्युटर सिस्टीम अँड नेटवर्किंग / डेटा अ‍ॅनालायटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा एम.सी.ए. (कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील बी.सी.ए. / बी.एससी. पदवीसह). १० वीला किंवा १२ वीला इंग्लिश विषयात किमान ६०% गुण मिळालेले असावेत. तसेच पात्रता परीक्षेत किमान सरासरी ६०% गुण मिळविणे आवश्यक. पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल इंडियन नेव्हीच्या officer@navy.gov.in या ई-मेलवर दि. १ जुलै २०२२ पूर्वी सादर करावा लागेल.

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी.

वजन – उंची आणि वय यांचे प्रमाणात वजन असावे. (पुरुष व महिला) ज्यांचे वय २० ते ३० वर्षे दरम्यानचे आहे आणि (i) उंची १५२ सें.मी. असलेले उमेदवारांसाठी किमान वजन ४३ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५३ कि.ग्रॅ.

(ii) १५७ / १५८ सें.मी. उंचीसाठी – किमान वजन ४६ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५७ कि.ग्रॅ. असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९९७ ते १ जानेवारी २००३ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती –  COVID-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निवडीकरिता घेण्यात येणारी इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (INET ( ड)) प्रवेश परीक्षा न घेता सव्‍‌र्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) इंटरह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल.

SSB इंटरव्ह्यूकरिता उमेदवार शॉर्ट लिस्ट करताना (१) बी.ई. / बी.टेक. पात्रताधारकांचे / अंतिम वर्षांच्या उमेदवारांचे पाचव्या सेमिस्टपर्यंतचे सरासरी गुण पाहिले जातात.

(२) पदव्युत्तर पदवी धारकांचे M.Sc./M.C.A./M.Tech. सर्व सेमिस्टर्सचे सरासरी गुण पाहिले जातील.

पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षांतील उमेदवारांचे प्री-फायनल वर्षांची गुणवत्ता पाहिली जाईल.

दि. १ जून २०१९ नंतर मिळविलेले नेव्हल / आर्मी / एअर विंगचे  NCC- C सर्टिफिकेट (किमान बी ग्रेडसह) उमेदवारांना  SSB साठी निवडताना किमान ५% गुणांची सूट दिली जाईल.

SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल.  SSB इंटरव्ह्यूची विस्तृत माहिती इंडियन नेव्हीच्या www. joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ट्रेनिंग – सब-लेफ्टनंट पदावर निवडलेल्या उमेदवारांना ४ आठवडय़ांचे नेव्हल अ‍ॅकॅडमी, इझिमाला येथे नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठविले जाईल. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग नेव्हल इस्टॅब्लिशमेंट्समध्ये दिले जाईल.

प्रोबेशन कालावधी – २ वर्षांचा असेल.

नेमणूकीचा कालावधी – निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला १० वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. उमेदवाराची कामगिरी /  मेडिकल फिटनेस इ. पाहून नेमणुकीचा कालावधी २ वर्षांसाठी वाढविला जाईल.

रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन अर्ज 

www. joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान करता येईल.

* कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC), क्षेत्रीय कार्यालय, मुंबई

(Advt. dt..२७.०१.२०२२).

पुढील ५९४ पदांची थेट भरती. 

ESIC च्या विविध रिजनल ऑफिसेसमधील एकूण रिक्त पदे – ४,३१५.

RO अहमदाबाद –  UDC – १३६, स्टेनो – ६,  MTS – १२७;  RO पणजी –  UDC – १३, स्टेनो – १,  MTS – १२;  फड विजयवाडा –  UDC – ७,  MTS – २६, स्टेनो – २;  RO – रायपूर –  UDC – १७,  MTS – २१, स्टेनो – ३;  RO इंदौर –  UDC – ४४,  MTS – ५६, स्टेनो – २;  RO बंगळूरु –  UDC – १९९,  MTS – ६५, स्टेनो – १८;  RO – हैदराबाद –  UDC – २५,  MTS – ४३, स्टेनो – ४ इ.

(१) अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – ३१८ पदे (अजा – ३२, अज – २९, इमाव – ८६, ईडब्ल्यूएस – ३२, खुला – १३९) (१३ पदे दिव्यांग कॅटेगरी  इ/ LV – ४ पदे,  D/HH- ३ पदे,  LD – ३ पदे,  SLD/MI- ३ पदे राखीव) (३२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान (use of Office Suites & Databases).

(२) स्टेनोग्राफर – १८ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७)

(१ पद दिव्यांग कॅटेगरी  इ/ LV साठी राखीव) (२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि स्किल टेस्टचे निकष – डिक्टेशन – १० मिनिटे ८० श.प्र.मि. वेगाने; ट्रान्सक्रिप्शन – ५० मिनिटे (इंग्लिश) व ६५ मिनिटे (हिंदिं).

(३) मल्टिटास्किंग स्टाफ (MTS) – २५८ पदे (अजा – २६, अज – २३, इमाव – ७०, ईडब्ल्यूएस – २६, खुला – ११३) (१० पदे दिव्यांग कॅटेगरी  इ/ LV – ३ पदे,  D/HH- ३ पदे,  LD – २ पदे,  SLD/ MIB इ. – २ पदे राखीव) (२६ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी UDC आणि स्टेनो पदांसाठी १८ ते २७ वर्षे; MTS पदांसाठी १८ ते २५ वर्षे.

(कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे)

वेतन – UDC व स्टेनो पदांसाठी पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,०००/-.  MTS पदांसाठी पे-लेव्हल – १, अंदाजे वेतन दरमहा रु. २९,०००/-.

निवड पद्धती – ( क) अप्पर डिव्हिजन क्लर्क व मल्टिटास्किंग स्टाफ पदांसाठी – फेज-१ – पूर्वपरीक्षा – (फक्त पात्रता स्वरूपाची) ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट (१) जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग, (२) जनरल अवेअरनेस,

(३) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, (४) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन – प्रत्येकी २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० प्रश्न व २०० गुण,

वेळ १ तास. पूर्वपरीक्षेतील गुणवत्तेनुसार १:१० प्रमाणात फेज-२ साठी उमेदवार निवडले जातील.

फेज-२ –  UDC व  MTS पदांसाठी मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची – पूर्वपरीक्षेसाठी असलेल्या विषयांवर आधारित प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातील. एकूण २०० प्रश्न, २०० गुणांसाठी वेळ २ तास.

ऑब्जेक्टिव्ह परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

मुख्य परीक्षेमधील गुणवत्तेनुसार १:५ प्रमाणात उमेदवार कॉम्प्युटर स्किल टेस्टकरिता निवडले जातील.

फेज-३ – (फक्त UDC पदांसाठी) कॉम्प्युटर स्किल टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची)

(१) २ पॉवर पॉइंट स्लाइड्स बनविणे – १० गुण, (२)  MS- Word वर मॅटर टाइप करणे (फॉरमॅटिंगसह) – २० गुण,

(३) फॉम्र्युले वापरून  MS- Excel वर

टेबल बनविणे – २० गुण.

एकूण ५० गुण,

वेळ ३० मिनिटे.

(II) स्टेनोग्राफर पदासाठी – फेज-१ – मुख्य परीक्षा – (१) इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन – १०० प्रश्न, वेळ ७० मिनिटे; (२) रिझिनग अ‍ॅबिलिटी – ५० प्रश्न, वेळ ३५ मिनिटे; (३) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, वेळ २५ मिनिटे. प्रत्येक प्रश्नास १ गुण. एकूण २०० गुण.

वेळ २ तास १० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षेतील कामगिरी पाहून १:१० प्रमाणात उमेदवार फेज-२ स्टेनोग्राफीतील स्किल टेस्टसाठी निवडले जातील.

फेज-२ – स्टेनोग्राफी स्किल टेस्ट पात्रतेमध्ये दिलेल्या निकषांनुसार घेतली जाईल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.

अर्जाचे शुल्क – अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक खातेअंतर्गत उमेदवारांसाठी रु. २५०/- (फेज-१ लेखी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना रु. २५०/- (बँकिंग चार्जेस वगळून) परत केले जातील. इतर उमेदवारांसाठी रु. ५००/-. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना परीक्षा केंद्र निवडावे लागेल. उमेदवार एकापेक्षा अधिक (एकाच किंवा विविध रिजन्समधील) पदांसाठी (UDC/ Steno/ MTS)) अर्ज करू शकतात.

अर्जासोबत – (१) पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (२०० X २३०  Pixels) (२०-५०  ‘kb). (२) सिग्नेचर (१४०  X ६०  Pixels) (१०-२०  kb), (३) डाव्या हाताच्या अंगठय़ाची निशाणी (८००  x ४०० Pixels)

(५०-१००  kb), (४) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र, jpg/jpeg फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज  http://www.esic.nic.inया संकेतस्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करावेत.

The post नोकरीची संधी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: नोकरीची संधीhttps://ift.tt/e2s43pQJB

0 Response to "नोकरीची संधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel