Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-02-05T05:00:58Z
Rojgar

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये (10th 12th board exams 2022) विद्यार्थ्यांचा लेखन सराव व्हावा, त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा, यासाठी प्रश्नपेढी उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली असून, 'एससीईआरटी'च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध केली जाणार आहे. http://www.maa.ac.in या वेबसाइटवर विषयनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आल्या आहेत. दहावी- बारावीच्या मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमाच्या सर्व विषयांच्या प्रश्‍नपेढी 'एससीईआरटी'च्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विषयांच्या घटकांवर किमान १५ ते २० प्रश्न, असा प्रत्येक विषयांचा प्रश्नसंच देण्यात आला आहे. हा प्रश्नसंच सोडवून विद्यार्थ्यांनी उत्तर लिखाणाचा सराव करावा, असे आवाहन 'एससीईआरटी'ने केले आहे. प्रश्नपेढी ही केवळ सरावासाठी असून, यामधील प्रश्न कदाचित मुख्य परीक्षेत विचारले जाणार नाहीत, असे 'एससीईआरटी'चे संचालक एम. देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची धास्ती घेतलेल्या विद्यार्थ्यांची भीती दूर व्हावी, त्यांना प्रश्नांचा अंदाज येऊन लेखनाची सवय व्हावी, या उद्देशाने ही प्रश्नपेढी तयार केली असल्याची माहिती 'एससीईआरटी'चे संचालक एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. या प्रश्नपेढीद्वारे विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकणार आहेत. करोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे बहुतांशी शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले आहे. यामुळे विद्यार्थी लेखनामध्ये मागे पडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन राज्य मंडळ व एससीईआरटी विविध उपाययोजना करीत आहेत. राज्य मंडळाकडून यापूर्वीच विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्याचा सराव व्हावा, यासाठी प्रश्नपेढीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी 'एससीईआरटी'तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करण्यासाठी, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार करण्यात आले आहेत. - एम. देवेंदर सिंह, संचालक, एससीईआरटी


source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-ssc-hsc-10th-12th-exam-2022-question-bank-available-for-board-exam-practice/articleshow/89360045.cms