TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

यूपीएससीची तयारी : उताऱ्यावरील माहितीचे आकलन

– विक्रांत भोसले

याअगोदरच्या लेखामध्ये आपण  उरअळ ची मागणी आणि परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे अभ्यासक्रमाच्या घटकांनुसार विश्लेषण केले होते. ते करत असताना आपण हे पाहिले होते की, उताऱ्यावरील आकलन क्षमता या घटकावर सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच इंग्रजी भाषेच्या आकलनाची किमान क्षमता निर्माण करणे ही या पेपरची प्राथमिक आणि मुख्य मागणी आहे. आज आपण या दोन्हीही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. 

इंग्रजी भाषेचे आकलन सुधारण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे परीक्षेला काही महिने शिल्लक असताना या घटकाची तयारी सुरू करणे. याचे कारण बऱ्याच उमेदवारांना इंग्रजी वाचताना आपल्याला सर्व काही अचूक समजत आहे असेच वाटते. यालाच आपण ‘ Illusion of Knowledgel असे म्हणतो. ही बाब लवकर लक्षात येत नाही आणि जेव्हा ती लक्षात येते तेव्हा परीक्षा जवळ येऊन ठेपलेली असते. म्हणूनच या घटकावर सर्वात अगोदरपासून काम सुरू करावयास हवे.

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे; पण हे करत असताना एक चांगला इंग्रजी शब्दकोश आणि इंग्रजी व्याकरण पुस्तक सतत संदर्भासाठी वापरावे. तरच असे वाचन आकलन क्षमता वाढवण्यास फायदेशीर ठरेल. मोबाइलमध्ये असणाऱ्या शब्दकोशाचा वापर टाळावा, कारण त्यामध्ये उजळणीसाठी काहीच पर्याय नसतो. आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आणि तुम्हाला परिचित नसलेल्या शब्दांची तसेच दररोजच्या वाचनात येणाऱ्या शब्दांची नियमित सूची करण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावणे आवश्यक आहे. या सूचीमध्ये शब्दांचे अर्थ लिहू नयेत. त्याऐवजी ते अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. दर दोन दिवसांनी या शब्दांची उजळणी करावी आणि त्यातील किती शब्दांचे अर्थ आपल्या आठवतात हे पाहावे. त्यामध्ये ज्या शब्दांचे अर्थ आठवतात त्यातील काही शब्द परत एकदा  Dictionary मध्ये पाहून खात्री करून घ्यावी आणि ज्या शब्दांचे अर्थ आठवत नाहीत त्या सर्व शब्दांचे अर्थ परत एकदा  Dictionary मध्ये पाहावेत. काही काळानंतर अशा शब्दांची संख्या कमी होईल. ज्या शब्दांचे अर्थ आपण पाहिले आहेत त्यांना  Dictionary मध्ये अधोरेखित करावे म्हणजे एखादा नवीन शब्द पाहताना अगोदर पाहिलेली शब्दांची नकळतच उजळणी होईल.

परीक्षेमध्ये उताऱ्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे दोन गटांत वर्गीकरण केले जाते.

१) सर्वसमावेशक प्रश्न. जसे की, उताऱ्याची मुख्य संकल्पना, उताऱ्यावरून निघणारे अनुमान, लेखकाचा उद्देश आणि त्याने काय गृहीत धरले आहे इ. या गटामध्ये शब्द, वाक्य आणि त्यांमधील संबंध यावरून अर्थ लावून उत्तर द्यावे लागते.

२) विशिष्ट ठरावीक माहितीवर आधारित प्रश्न. यामध्ये उताऱ्यातील एखाद्या विशिष्ट भागावर प्रश्न विचारले जातात. या गटात उताऱ्यामध्ये हे उत्तर नेमके कुठे आहे हे शोधावे लागते. अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगवेगळी रणनीती वापरावी लागते.

मुख्य संकल्पना ही अशी सर्वसमावेशक संकल्पना वा वाक्य असते, की ज्याला उताऱ्यातील बाकीच्या गोष्टी आधार देत असतात.  Main idea,  central theme,  best sums up,  passage refers to इ. वाक्यांशाचा वापर करून मुख्य संकल्पनेवर प्रश्न विचारले जातात.

जी गोष्ट लेखक उताऱ्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या सांगत असतो तिला अनुमान वा कयास असे म्हणतात. अनुमानाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश-  inference,  passage implies,  view implied,  conclusion,  implicationsइ. आहेत. उताऱ्यामध्ये केलेला युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो. अनुमान आणि मुख्य संकल्पना यांतील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे अनुमान हे मुख्य संकल्पनेसारखे सर्वसमावेशक असेलच असे नाही, कारण ते संपूर्ण उताऱ्यावर आधारित असेलच असे नाही.

गृहीतक (Assumption) ही अशी बाब आहे, की जिच्याबद्दल लेखक पुरेशी माहिती देणे आवश्यक समजत नाही वा तो असे समजतो की, हे वाचकांना माहिती आहे. अशा प्रकारे गृहीतकदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असते; पण ते लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते. इथे अनुमान आणि गृहीतक यातील फरक लक्षात घ्यावा, कारण दोन्हीही अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असतात; पण गृहीतक हे लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते आणि लेखकाचा युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो.

जर उतारा हा दोन वा जास्त परिच्छेदांचा असेल तर अगोदर प्रश्न वाचून घ्यावेत आणि त्यातील महत्त्वाचे कळीचे शब्द लक्षात ठेवावेत आणि उतारा वाचताना ते अधोरेखित करावेत म्हणजे विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी परत शोधाशोध करावी लागणार नाही. याव्यतिरिक्त मोठ्या उताऱ्यासाठी  Structure of the Passage Approach,  Story- line Approach आणि  Optimized Reading Approach इ.चा गरजेनुसार वापर करावा; पण हे करण्याअगोदर वरील पद्धतींची माहिती घेऊन पुरेसा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे.

यानंतरच्या लेखामध्ये आपण तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता या घटकाच्या तयारीवर चर्चा करणार आहोत.

The post यूपीएससीची तयारी : उताऱ्यावरील माहितीचे आकलन appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: यूपीएससीची तयारी : उताऱ्यावरील माहितीचे आकलनhttps://ift.tt/0O9GUzh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या