
UPSC : नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. २ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Central Public Service Commission, UPSC) नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२२ आणि भारतीय वनसेवा प्राथमिक परीक्षा २०२२ च्या संयुक्त संचालनासाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा तपशील देण्यात आला आहे. विविध केंद्रीय सेवांमधील ग्रुप ए आणि ग्रुप बी (राजपत्रित) पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जात आहे. यासाठी यूपीएससी आणि भारतीय वन सेवा परीक्षेद्वारे (Indian ) दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी प्राथमिक परीक्षा पहिल्या टप्प्यात एकत्रितपणे आयोजित केली जाते. २०२२ च्या या एकत्रित प्राथमिक परीक्षेचे नोटिफिकेशन आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या यूपीएससी पूर्व परीक्षा २०२२ नोटिफिकेशन जाहीर होण्यासोबत परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आयोगाने २०२२ सालासाठी जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, उमेदवार २२ फेब्रुवारीपर्यंत पूर्व परीक्षा २०२२ ला बसू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. नागरी सेवा आणि वनसेवा प्राथमिक परीक्षेसाठी पात्रता नागरी सेवा आणि वनसेवा प्राथमिक परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम वर्ष/सेमिस्टर परीक्षेत बसलेले उमेदवार देखील यूपीएससीद्वारे आयोजित नागरी सेवा आणि वन सेवांच्या एकत्रित प्राथमिक परीक्षेत बसू शकतात. आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तारखांना उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सवलत देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिक आणि इतर तपशीलांसाठी नोटिफिकेशन पाहता येणार आहे. ईएसई परीक्षेच्या तारखा जाहीर यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर, ईएसई पर्सनॅलिटी टेस्ट २०२१ साठी पात्र झालेले उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. उमेदवार नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या वेळेनुसार मुलाखतीला पोहोचू शकतात. ही परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. यावेळी व्यक्तिमत्व चाचणीची तारीख आणि वेळेत बदल करण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र अपलोड केले जाणार आहे. नवीन अपडेटसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-civil-services-2022-notification-of-civil-service-and-forest-service-joint-preliminary-examination-issued/articleshow/89314605.cms
0 टिप्पण्या