Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली सीबीएसई आणि अन्य शिक्षण मंडळांच्या १० वी आणि १२वीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय परीक्षा कशी काय घेतली जाऊ शकते, अशी तोंडी विचारणा न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने मंगळवारी केली. याआधी याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी करोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असली तरी शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याकडे लक्ष वेधले. तसेच, याचिकाकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी या प्रकरणाची तत्काळ सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्यावर ही सुनावणी बुधवारी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १० वी आणि १२ वीच्या टर्म २ च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. टर्म २ च्या परीक्षा २६ एप्रिलपासून होणार आहेत. दरम्यान, कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि ISC म्हणजेच बारावीच्या परीक्षा घेण्याची शक्यता आहे. CISCE ने सांगितले आहे की, सविस्तर वेळापत्रक, CISCE लवकरच प्रसिद्ध केले जाईल. अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी बोर्ड परीक्षांचे मूल्यांकन वैकल्पिक पद्धतीने करण्याची मागणी केली आहे आणि यासंबंधी सीबीएसई, आयसीएससी, एनआयओस या बोर्डांनी वैकल्पित मोडवर आधारित मूल्यांकनाची मागणी केली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/supreme-court-to-hear-class-10-and-12-board-exam-cancellation-plea-today/articleshow/89764035.cms