Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १४, २०२२ WIB
Last Updated 2022-02-14T08:00:17Z
Rojgar

CBSE टर्म १ परीक्षेचा निकाल आता 'या' तारखेला जाहीर होण्याची शक्यता

Advertisement
2022: परीक्षा दिलेले दहावी-बारावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या तारखेच्या घोषणेबाबत देशभरातील विद्यार्थ्यांद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकामागून एक मीम शेअर केले जात आहेत. दुसरीकडे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप सीबीएसई टर्म १ निकालाबाबत कोणतेही अधिकृत अपडेट जारी केलेले नाही. असे असले तरी सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांच्या शिक्षकांकडून मिळालेल्या अपडेटनुसार, सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ चा निकाल आता १६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी या आठवड्यातच त्यांच्या टर्म १ च्या विविध विषयांच्या परीक्षांचे गुण कळण्याची शक्यता आहे. सीबीएसई टर्म १ निकाल २०२२ अंतर्गत, विद्यार्थ्यांचे डिजिटल स्कोअर कार्ड भारत सरकारच्या डिजिलॉकर (DigiLocker) पोर्टल आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध करून देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचा निकाल DigiLocker वर उपलब्ध असेल असे जाहीर करण्यात आले. २६ एप्रिलपासून परीक्षा २०२१-२२ या वर्षासाठी सीबीएसईच्या दुसऱ्या टप्प्याची बोर्ड परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होण्याची तारीख बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. दरम्यान सीबीएसईने याचे वेळापत्रक जाहीर केले नाही. हे वेळापत्रक मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. देशभरातील विद्यार्थी आणि पालक टर्म २ च्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात विद्यार्थी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिक्षणमंत्री, सीबीएसई आणि इतरांना विनंती करत आहेत. शिकवणी वर्ग ऑनलाइन घेण्यात आले होते आणि करोना प्रादुर्भाव संपला नसताना परीक्षा ऑफलाइन का? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. त्यामुळे सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट जाहीर केला जाणार आहे. एकाचवेळी सर्व विद्यार्थी निकाल पाहत असल्याने वेबसाइट हॅंग किंवा क्रॅश होण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना डिजीलॉकर आणि उमंग अॅपद्वारे तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. डिजीलॉकर अॅपद्वारे CBSE टर्म १ चा निकाल तपासण्यासाठी... स्टेप १) तुमच्या स्मार्टफोनवर Play Store वरून 'DigiLocker APP' डाउनलोड करा. स्टेप २) होमपेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा. स्टेप ३) तुमचे नाव (जे आधार कार्डाप्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन भरा. स्टेप ४) सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर यूजरनेम सेट करा. स्टेप ५) खाते तयार केल्यानंतर, 'सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा बारावी निकाल २०२१' या लिंकवर क्लिक करा. स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा. स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. CBSE दहावी, बारावीचा निकाल उमंग अॅपवर तपासण्यासाठी.. स्टेप १) मोबाइलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा. स्टेप २) अॅपच्या होमपेजवर ऑल सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा. स्टेप ३) त्यानंतर दहावी किंवा बारावीचे निकाल पाहण्यासाठी 'CBSE' या लिंकवर क्लिक करा. स्टेप ४) आवश्यक क्रेडेन्शियल्स भरुन लॉग इन करा. स्टेप ५) सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावीच्या निकाल लिंकवर क्लिक करा. स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा. स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-result-2022-term-1-cbse-term-1-exam-result-now-likely-to-be-declared-on-this-date-know-update/articleshow/89560048.cms