Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १७, २०२२ WIB
Last Updated 2022-02-17T09:00:39Z
Rojgar

CMAT Exam 2022: सीएमएटी परीक्षेसाठी 'येथे' करा अर्ज, पात्रता निकष जाणून घ्या

Advertisement
CMAT : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने २०२२ नोंदणी फॉर्म जाहीर केला आहे. सीएमएटी परीक्षेची तयारी करत असणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in वर जाऊन सीएमएटी २०० (CMAT 2022) नोंदणी करु शकतात. १७ मार्च २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी सीएमएटी नोंदणी फॉर्म भरण्यापूर्वी पात्रता निकष जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीएमएटी २०२२ नोंदणी विंडो बंद झाल्यानंतर एनटीएकडून सर्व नोंदणीकृत उमेदवारांसाठी एक करेक्शन विंडो उघडण्यात येईल. सीएमएटी अर्ज २०२२ भरताना उमेदवारांना पुरुष उमेदवारांना २००० रुपये तर महिला उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या मदतीने ऑनलाइन माध्यमातून सीएमएटी अर्ज भरता येणार आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कागदपत्रांची स्कॅन कॉपी जसे की पूर्वीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. असा करा अर्ज (CMAT application form 2022) एनटीए सीएमएटी (NTA CMAT) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. CMAT २०२ साठी नोंदणी करा. सीएमएटी २०२२ अर्ज भरा आणि पासवर्ड टाका. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. CMAT साठी अर्ज शुल्क भरा. कन्फर्मेशनचे पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी जपून ठेवा. पात्रता निकष सीएमएटी परीक्षेसाठी नोंदणी करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी देखील सीएमएटी २०२२ साठी अर्ज करु शकतात. उमेदवारांकडे भारताचे नागरिकत्व असावे. सीएसएटी २००२२ अर्ज भरण्यासाठी एक वॅलिड ईमेल-आयडी आणि फोन नंबर, स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग असणे गरजेचे आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/cmat-exam-2022-cmat-exam-application-form-released-know-who-can-apply-see-details/articleshow/89634966.cms