Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ११, २०२२ WIB
Last Updated 2022-02-11T10:00:48Z
Rojgar

CTET Result 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल कधी? CBSE कडून अपडेट

Advertisement
CTET : सीटीईटी परीक्षा २०२१ (CTET 2021) च्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) कडून (CTET) २०२१ चा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. बोर्डाद्वारे सीटीईटी निकाल २०२१ च्या घोषणेसह अंतिम उत्तरतालिका देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. सीटीईटी डिसेंबर २०२१ च्या निकालाची तारीख आणि अंतिम उत्तरतालिका जाहीर होण्याच्या तारखेसंदर्भात सीबीएसईकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही. पण कोणत्याही दिवशी ही घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता आहे. सीबीएसईने डिसेंबर सत्राची सीटीईटी परीक्षा २०२१ ही १६ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीत विविध तारखांना आयोजित केली होती. यानंतर बोर्डाने ३१ जानेवारी रोजी सीटीईटी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध केली असून, ४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या. विहित प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. यासाठी प्रति प्रश्न १००० रुपये शुल्क आणि साक्षांकित पुरावे जोडावे लागतील. या आधारे सीबीएसई सीटीईटी निकाल २०२१ जाहीर केला जाईल. उत्तरतालिकेवरुन वाद, सीबीएसईचा निर्णय अंतिम सीबीएसईने जाहीर केलेल्या उत्तरतालिकेमध्ये असलेल्या अनेक त्रुटींबाबत उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध प्रदर्शित करीत आहेत. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी १००० रुपये शुल्क देण्यावरुनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे ३१ जानेवारी २०२२ रोजी सीबीएसईने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, सीटीईटी अंतिम उत्तरतालिका २०२१ वर बोर्डाचा निर्णय अंतिम असेल. 2021: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात. उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ctet-result-2021-cbse-to-announce-central-teacher-eligibility-test-result-soon-final-answer-key-will-also-be-released/articleshow/89495515.cms