TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Education Budget 2022: वन क्लास वन टीव्ही चॅनेलसाठी २०० वाहिन्या; ई-शिक्षणाचा कंटेंट वाढवण्यावर भर

देश करोना संक्रमणामुळे गेली दोन वर्ष होरपळला आहे. अन्य अनेक क्षेत्रांसोबत शिक्षण क्षेत्रावर कोविड-१९ महामारीचा खूप मोठा परिणाम झाला आहे. साहजिक याचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पात उमटणे स्वाभाविक होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) यांनी ई-शिक्षण सुविधांमध्ये वाढ करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2022) भर दिला आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनेलच्या वाहिन्या वाढवणार वन क्लास वन टीव्ही चॅनेल या लॉकडाऊन काळानंतर सुरू झालेल्या योजनेंतर्गत सध्या केवळ १२ वाहिन्या उपलब्ध होत्या. त्या येत्या काळात २०० पर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. प्रादेशिक भाषेत इयत्ता पहिली ते बारावीसाठी पुरवणी शिक्षण देण्यासाठी या वाहिन्यांचा उपयोग केला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण ई-कंटेंटवर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या. डिजीटल विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी डिजीटल विद्यापीठ विकसित केले जाईल. या विद्यापीठाद्वारे ISTE दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या. डिजीटल देश ई-पोर्टल कौशल्यविकासावर भर देणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता यावेत. तरुणांचे स्किलींग, अपस्किलींग आणि रिस्किलींग व्हावे यासाठी डिजीटल देश (Digital DESH e-portal)लाँच केले जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.


source https://maharashtratimes.com/career/career-news/education-budget-2022-one-class-one-tv-channel-scheme-will-increase-upto-200-channels-quality-digital-content-for-education/articleshow/89266352.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या