Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी २१, २०२२ WIB
Last Updated 2022-02-21T09:01:10Z
Rojgar

GATE २०२२ परीक्षेची उत्तरतालिका आज होणार जाहीर, 'येथे' नोंदवा आक्षेप

Advertisement
Answer Key: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर ( Kharagpur) तर्फे गेट परीक्षेची (GATE 2022) आज जाहीर केली जाणार आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार गेटची अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जाऊन उत्तरतालिका तपासू शकतात. यावर्षी गेट २०२२ ची परीक्षा ४ दिवसात घेण्यात आली होती. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ५, ६, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. उमेदवारांना अर्ज पोर्टलवर लॉगिन करून उत्तरतालिका पाहता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी स्वतःचा नावनोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरून अर्ज करावा लागणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर यांनी जाहीर केलेल्या नोटीसनुसार, उमेदवारांना मंगळवार २२ फेब्रुवारी ते शुक्रवार २५ फेब्रुवारी या कालावधीत उत्तरतालिकेवर (GATE 2022 Answer Key) वर आक्षेप नोंदवता येणार आहे. गेट २०२२ चा निकाल गुरुवार, १७ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. सोमवार, २१ मार्च २०२२ पासून उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील. GATE : अशी करा डाऊनलोड १ : सर्वप्रथम, उमेदवार IIT GATE च्या अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जा. २ : त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या GATE Answer Key 2022 च्या लिंकवर क्लिक करा. ३ : आता लॉगिन विंडोवर तपशील भरून लॉग इन करा. ४ : तुमच्या स्क्रीनवर उत्तर तालिका दिसेल. ५ : उत्तरतालिका नीट तपासून घ्या. ६ : आता उत्तरतालिका डाऊनलोड करा. परीक्षा पॅटर्न GATE कॉम्प्युटर-आधारित म्हणजेच ऑनलाइन चाचणी असते. सर्व विभागांमधून एकूण ६५ प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न बहुपर्यायी आणि संख्यात्मक स्वरूपाचे आहेत. परीक्षा एकूण १०० गुणांची असते. परीक्षेचा एकूण कालावधी ३ तासांचा असतो. विभाग : जनरल अॅप्टिट्यूड, इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स आणि विशिष्ट विषय इ. तीन विभागांमधून प्रश्न विचारले जातात. मार्किंग स्कीम: मल्टीपल चॉइस आणि संख्यात्मक प्रश्न १ किंवा २ गुणांचे असतील. १ गुणाच्या मल्टीपल चॉइस प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण जादा कापले जातील आणि २ गुणांच्या प्रश्नातील चुकीसाठी २/३ गुण जादा कापले जातील. संख्यात्मक प्रकारातील प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. जनरल अ‍ॅप्टिट्यूडमध्ये १ गुणांचे ५ प्रश्न आणि २ गुणांचे ५ प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे एकूण १५ गुणांचे १० प्रश्न असतील. GG, XE आणि XL वगळता, उर्वरित विभागात प्रत्येकी १ गुणांचे २५ प्रश्न आणि प्रत्येकी २ गुणांचे ३० प्रश्न आहेत. अशा प्रकारे एकूण ८५ गुणांचे ५५ प्रश्न असतील.


source https://maharashtratimes.com/career/career-news/gate-2022-answer-key-of-gate-exam-will-be-released-today-know-details-on-gateiitkgpacin/articleshow/89717733.cms