IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

IBPS PO Mains 2021-22: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection, IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर्स मुख्य परीक्षेचा (PO Mains Exam) चा निकाल जाहीर केला आहे. पीओ मुख्य परीक्षा २०२२ (IBPS PO Mains Exam 2022) मध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. नोटिफिकेशननुसार, या महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. आयबीपीएस पीओ पूर्व परीक्षेत साधारण पाच लाख उमेदवार बसले होते. पूर्व परीक्षेचा निकाल ५ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर्सची परीक्षा २२ जानेवारी रोजी घेण्यात आली. ही परीक्षा २०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि २५ गुणांसाठी वर्णनात्मक प्रश्नांवर आधारित होती. वस्तुनिष्ठ चाचणीत चुकीच्या उत्तरांना निगेटीव्ह मार्कींग देणात आली. IBPS PO Mains Result 2021-22: असा पाहा निकाल निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- ibps.in वर जा. यानंतर Common Recruitment Process (CRP) for Recruitment of Probationary Officers/ Management Trainees in Participating Banks (CRP PO/MT-XI) या लिंकवर क्लिक करा. पुढच्या पेजवर लॉगिन करा. रोल नंबरच्या मदतीने या पीडीएफमध्ये निकाल पाहू शकता. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट काढा. रिक्त जागांचा तपशील इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे (IBPS) विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत फेरी या तीन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र असतील. आयबीपीएस पीओ पूर्व परीक्षेमध्ये मिळालेले गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीसाठी बोलावले जाते. IBPS कॅलेंडर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या माध्यमातून २०२२-२३ सत्रात होणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बँक परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर असलेल्या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण तपशील पाहता येणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ibps-po-mains-result-2021-22-ibps-po-mains-result-declared-check-direct-link-here/articleshow/89494112.cms

0 Response to "IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel