ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

CA Intermediate Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ शनिवारा २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाला आहे. सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ निकाल आयसीएआयची अधिकृत वेबसाइट icai.org वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार रजिस्ट्रेशन क्रमांक आणि रोल नंबरच्या सहाय्याने पोर्टलवर लॉग इन करून सीए इंटर डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल डाऊनलोड करू शकतील. १८ फेब्रुवारी रोजी झाली होती घोषणा आयसीएआय सीए इंटरमिजिएट २०२१ निकालाच्या तारखेची घोषणा आयसीएआयचे CCM धीरज खंडेलवाल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी केली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते या निकालाची गेले अनेक दिवस वाट पाहत होते. कसा पाहाल ? सर्वात आधी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइट किंवा caresults.icai.org वर जावे लागेल. यानंतर होमपेजवर महत्त्वाची घोषणा या सेक्शनवर क्लिक करावे. यानंतर एक नवे पेज उघडेल. येथे आयसीएआय सीएइंटर २०२१ निकाल या लिंकवर क्लिक करा. यानंतर लॉगिन पेज वर, रोल नंबर आणि पासवर्ड आदि क्रेडेंशियल नोंदवा. आता आयसीएआय सीए इंटर निकाल २०२१ स्क्रीन वर दिसेल. निकाल तपासा आणि सेव्ह करा. निकालाचे एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.


source https://maharashtratimes.com/career/career-news/icai-ca-inter-result-2021-icai-ca-inter-result-2021-released-at-icaiexam-icai-org/articleshow/89849593.cms

0 Response to "ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel